पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२६२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सवाई माधवरावाचे लग्न | २३३ नवसली ती पिरास नजर केली व फकीरास खुर्दा वांटला. त्याचा उल्लेख वरील भागांत त्याच पृष्ठावर आहे तो असा : ] | ३ छ १६ रोज सैद सादत पीर कसबे पुणे राजश्री सदाशिवपंतास देवी आल्या होत्या ते समई कंदोरी नवसिली होती ती केली सबब १ नजर पिरास २ खुर्दा फकीरास वाटावयास [ वरील उतायावरून पेशव्यांच्या बायकांचा सुद्धां पिरावर भरंवसा असून प्रसंगविशेषीं ते त्यास नवस करीत असे दिसते. अहमदनगरासहि तोच प्रकार होता.] काव्येतिहाससंग्रह, सवाई माधवरावाचे लग्न { १०-२-१७८३ (?) | कामांची नेमणूक व विल्हेवारी [ही ४८ कलमी याद मूळांतून वाचण्यासारखी आहे. नमुन्यादाखल एक कलम दिले आहे. यावरून नानांची दक्षता व बारीक नजर लक्षांत येते.] नेमणूक लग्न* श्रीमंत राजश्री रावसाहेब सुरू सन सल्लास समानीन मया व अलफ. कामें नेमून सांगितलीं : (८) गंध अक्षत उगाळून लावण्याचे काम जनार्दन मुकुंद यांजकडे व बाबाजी लबोदर. - केशरी गंध अर्काचे व मध्यम ऐशी दोन प्रकारची चांगलीं, रंगदार कपाळी लावावयासि; व अंगास लावण्यास केशर व अर्गजा वगैरे सुवासिक एक व साधे पांढरें एक व गुलाबी चंदनाचे व कृष्णागराचे' याप्रमाणे चांगली उगाळावी. केशरी गंधांत केशराची कसर राहू नये. व अक्षता उंच कस्तुरीची । * हे लग्न माघ शु. ९ श. १७०४ ता. १०-२-१७८३ रोजी झालें. १ एक प्रकारचा चंदन. [७७ ।