Jump to content

पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३० हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास त्यांच्या वाटेतच मराठ्यांचा तळ होता म्हणून त्याने विनंति केली कीं उद्या सकाळी आपण तळ हलवू. मराठ्यांनी उत्तर दिलें कीं ही आज्ञा त्यांनी आनंदानें मानली असती, परंतु असे करणे अशुभ व धर्माचाराच्या विरुद्ध आहे, (म्हणून त्यांचा निरूपाय आहे.) कारण जेथे आठ दिवस ते तळ देतात तेथून नवव्या दिबशी त्यांना हलतां येत नाही. त्यांच्या या भ्रामक समजुतीला लॉर्ड कॉर्नवॉलीसने मान दिला व आपला वेत पुढे ढकलला ! अभ्यास :--या उतान्यांत मराठ्यांसंबंधी कोणती माहिती मिळते ते मुद्देसूद व थोडक्यांत लिहा. तुम्हांस ती कितपत यथार्थ वाटते याची चर्चा करा. ३७ । । । मराठ्यांना इंग्रज शरण आल | (इ. स. १७७९ ) [स्प्रिगेल या जर्मन लेखकाने इ. स. १७९१ साली मराठ्यांचा इतिहास लिहिला व त्यांत प्रारंभापासून ते १७ मे १७८२ रोजा झालेल्या इंग्रज-मराठ्यांच्या तहापर्यंत हकीकत आणून ठेवली आहे. पुस्तकास हिंदुस्थानचा नकाशा जोडला आहे. तो मेजर रेनेल यांच्या | नकाशावरून काढला असे म्हटले आहे. स्प्रिगेल हिंदुस्थानांत कधीच आला नव्हता, पण त्याने ३९ इंग्रजी व २४ इतर युरोपियन | भाषांतील तत्कालीन ग्रंथ वाचून हा इतिहास तयार केला. सर्व हि स्थानांतील लोकांत मराठ्यांनी मोगल साम्राज्य जिंकण्यांत यश मिळ विले, त्यांचा जितक्या झपाट्याने लौकिक झाला तितक्याच वेगाने त्यांचा अधःपात झाला यामुळे लेखकाचे लक्ष मराठ्यांकडे जाऊन त इतिहास लेखनास प्रवृत्त झाला असे त्याने म्हटले आहे. त्याच्या पुस्तकाचा पृष्ठे २८८ असून त्याची प्रत भा. इ. सं. मंडळांत आहे. मराठ्याचा पहिला इतिहासकार होण्याचे श्रेय या दूरस्थ जर्मन पंडितास आहे !! .....प्रत्येक दिवशीं या प्रबळ सैन्याकडून इंग्रजावर हल्ला चढाने जात होता. जसेजसे इंग्रज लोक पुढे सरकू लागले तसतसे मराठ इंग्रजांच्या जनावरांच्या आणि (माणसांच्या) रसदेचा नाश केला ; ३९ आणि खेड्यांत आगी लावल्या, हेतु हा की या कारणांनीं (होणा-या) दुनि भुळे आणि अपुरेपणामुळे इंग्रजांना परतणे भाग पडावें. (शेवटीं) इन्न' ७४] । ठयांनी ) मिळते जांनी