पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/२५८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठे-इंग्रज सेनापतींची भेट २२९ पण युद्धभूमीखेरीज इतरत्र अंग वांकविण्यांत त्यांना कमीपणा वाटे. रणभूमीवरहि प्रत्यक्ष प्रसंग आला म्हणजे (सैन्य संख्या पुष्कळ असली तरी) एकसूत्रीपणाच्या अभावामुळे त्यांचा उपयोग होत नसे ! ... (अन्न न मिळाल्याने) भुकेने व्याकूळ झालेले आमचे सैनिक हजारोंनी मराठ्यांच्या छावणीकडे धांवले व घान्य मिळाल्याने आनंदित झाले.. साधारणपणे बाजारभाव रुपयास ३ शेर तांदूळ, ६ शेर राई किंवा हरबरे असा होता. | मराठ्यांचा तळ आमच्यापासून सहा मैलांवर होता. ही छावणी म्हणजे एक अव्यवस्थित शहरच होते. सेनापतीच्या सभोंवतीं कसेतरी इतर सरदारांचे तंबू ठोकलेले होते. त्यांचे आकार व रंग इतके भिन्न होते की दुरून ती घरेंच वाटत. रस्ते वळणावळणाचे असुन (भोंवतालच्या गर्दीने त्यास) जत्रेचे स्वरूप दिसे. सराफ, रत्नपारखी, सोनार, इतर हुन्नरी लोक बिनधोक आपले उद्योग चालू ठेवीत. जणू काय आपण शांत असलेल्या पुण्यांतच आहोंत ! | तोफांची मांडणी विचित्र असे. त्या अनेक आकाराच्या असून त्यांच्यावर चमत्कारिक चित्रे रंगविलेली होती. प्रत्येकीस कोठल्या तरी देवतेचे नांव दिलेले असे. त्यांतील कांहीं तोफा निरुपयोगी होत्या, पण पूर्वी त्यांनी चांगली कामगिरी केली म्हणून त्या (सैन्याबरोबर) बाळगलेल्या असत. ज्या तोफा चांगल्या होत्या त्यांचाहि पूर्ण उपयोग मराठ्यांना होत नसे, कारण त्यांच्याजवळ दारुगोळा थोडा असे. रात्रौ ९ ते १० च्या दरम्यान एकाएकीं मराठ्यांच्या छावणीत तोफांचे बंदुकांचे आवाज ऐकू येऊ लागले. आमचे सैनिक सज्ज झाले व हत्यारे सांवरू लागले, कारण त्यांना वाटले की टिपूने मराठ्यांवर हल्ला केला आहे परंतु नंतर असे कळलें कीं, प्रतिपदेला उदित होणा-या चंद्र-दर्शनानिमित्त सलामी देण्यासाठी त्या तोफा मराठ्यांनीं डागल्या होत्या. आपल्या सैन्याचा तळ ज्या मैदानावर होता ते अगदीं अस्वच्छ, ओसाड, वे उघडे होते. तेथून लवकर हलावे अशी लॉर्ड कॉर्नवॉलीसची इच्छा होती १५ सा. इ. [७३