पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे







स्वराज्य आणि स्वधर्म


 फार प्राचीन काळापासून हिंदुसमाजात समता आणि विषमता, संघटना आणि विघटना, गुणनिष्ठा आणि जन्मनिष्ठा, बुद्धिनिष्ठा आणि शब्दप्रामाण्य असे दोन विचारप्रवा चालू असून त्यांतील दुसऱ्या समाजघातकी प्रवाहाचा जोर इसवी सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकापासून वाढत गेला आणि त्यामुळे या समाजाचा अधःपात झाला, हा विचार गेल्या चार प्रकरणांत सविस्तर मांडला. या काळाच्या सुमाराला नव्या स्वतंत्र स्मृती निर्माण होण्याचे बंद झाले; आणि जुन्या स्मृतींवर टीका करणारे, अनेक स्मृतींचे सारार्थ काढून त्यावरून नवीन धर्मशास्त्र बनविणारे असे धर्मशास्त्रकार उदयास आले. या धर्मशास्त्रकारांना निबंधकार व त्यांच्या ग्रंथांना निबंध असे नाव रूढ झालेले आहे. या निबंधकारांपैकी मेधातिथी, विद्यारण्य, यांसारखे काही अपवाद वजा जाता, बहुतेक शब्दप्रामाण्यवादी, अंध, समाजपरिस्थिती पाहून, स्वतंत्र चिंतन करून निर्णय करण्याची ऐपत नसलेले, समाजाच्या उत्कर्षापकर्षाची कारणमीमांसा करण्यास असमर्थ आणि प्रतिगामी, अविवेकी व मूढ असेच होते. त्यामुळे हिंदुधर्मशास्त्राला उत्तरोत्तर समाजघातक व विकृत रूप येत गेले; व त्याचाच परिणाम होऊन हिंदुसमाज रसातळाला गेला. इसवी सनाच्या आठव्या शतकात सिंध प्रांत मुस्लीमांच्या ताब्यात गेला तो कायमचा आणि दहाव्या शतकात