पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रस्तावना : ९

फ्रान्स येथील ग्रंथपालांच्या हकीकती मधून मधून वाचण्यात येतात. हा प्रबंध लिहिताना मला त्यांची आठवण होत असे.
 माझे सर्व लेखन पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याची कायमची जबाबदारी श्री. अनंतराव कुलकर्णी यांनी घेतलेलीच आहे. त्यामुळे त्यासंबंधी विवंचना करण्यात माझी शक्ती मुळींच खर्च होत नाही. मी माझा हा भाग्ययोग समजतो. कारण माझा सर्व वेळ मला त्यामुळे लेखनाला देता येतो.
 कल्पना मुद्रणालयाचे मालक श्री. चिं. स. लाटकर यांना नुकतेच उत्कृष्ट छपाईबद्दल महाराष्ट्र राज्यसरकारचे पारितोषिक मिळाले आहे. ते कसे सार्थ आहे हे या ग्रंथाच्या छपाईवरून कळून येईलच. अशा सुंदर छपाईसाठी श्री. लाटकर यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

जानेवारी १९६७
पु. ग. सहस्रबुद्धे