पान:हिंदुधर्म-तत्त्वसंग्रह.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना. 4:0: हिंदु धर्माची तत्त्वे लहानापासून थोरापर्यंत सर्वांस थोडक्यांत कशी आगत करून देतां येतील या तळमळीने हा प्रयत्न केला आहे. ग्रंथविस्तार धर्माच्या जुनेपणामुळे आणि संग्राहकबुद्धीनें अत्यन्त बाढलेला आणि बारीकसारीक गोष्टींचा सुद्धां अत्यंत खोलपणाने व विस्तारपूर्वक विचार केलेला असल्यामुळे मुख्य सिद्धान्ता- वरून शहाण्यांची सुद्धां दृष्टि चलित होते, असा वारंवार अनुभव येतो. ही स्थिति सुधारणें अत्यन्त जरूर आहे म्हणून हा छोटासा नमुन्यादाखल उपक्रम कर-यांत येत आहे. साधारणपणे खोल न शिरतां ठोकळ गोष्टी मांडल्या आहेत. तथापि कांही ठिकाणी मत- भेद किंवा प्रमाद होण्याचा संभव राहगारच; त्याला नाइलाज आह. योग्य सूचनांचा आम्ही अत्यंत आदरपूर्वक उपयोग करूं. वेद, स्मृति आणि पुराणें यांची नांवें वगैरे आम्ही मुद्दाम सवि- स्तर दिली आहेत. त्याकडे प्रत्येक वाचकानें अवश्य लक्ष पुरवावे. आपल्या ग्रंथसंपत्तीची हेळसांड ही केव्हांहि आपल्याला कमीपणा आणणारीच आहे, ही गोष्ट वाचकांनीं ध्यानांत धरावी. यापूर्वी आम्ही लिहिलेले धर्मशिक्षण पुस्तक पुष्कळच लोकांना पसंत पडलें. पुणे येथील भारतहायस्कूलच्या चालकांनी आपल्य शाळेत व पुणे शहर म्युनिसिपालिटीतील सर्व शाळांत आमचे पुस्तक धर्मशिक्षणाकरितां लाविले आहे. व इतर कांहीं संस्थांनी -लावणाचें आश्वासन देऊन या काम उत्तेजन दिले आहे याबद आम्ही त्यांचे आभारी आहों. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव