पान:हिंदुधर्म-तत्त्वसंग्रह.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ उत्तर: – शत्रूपासून राष्ट्रांचें संरक्षण करणे आणि ब्राम्हणादि वर्णांना स्वकार्यतत्पर ठेवणं. प्रश्न: – वैश्यांचें काम काय ? उत्तर: – सर्व प्रकारचा व्यापार करून धनसंपादन करणे आणि 47 - त्या धनाचा उपयोग क्षत्रिय, ब्राह्मण आणि शूद्र यांच्याकरितां करणें. प्रश्न: - शूद्रांचें काम काय ? उत्तर:--ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांच्या प्रत्येक कार्यास मदत करणें हें होय. प्रश्नः—यांपैकी कोणीहि स्वकर्मापासून च्युत झाल्यास आणि आपआपली जबाबदारी सोडल्यास काय होते ? उत्तरः— त्यांना मोक्ष मिळत नाहीं, समाज दुबळा होतो, आणि याची सर्वे जबाबदारी ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यावर येते. प्रश्न: – कोणताहि वर्ण आपल्या कामापासून च्युत झाल्यास काय करावें. उत्तर:--इतर वर्णांनी त्याचें काम. त्याला करण्यास भाग पाढायें, नाहीं तर समाजांत त्याला निंद्य करून सोडावें. प्रश्न: - चातुर्वर्ण्य हें गुणावर अवलंबून आहे कां जन्मावर अव लंबून आहे ? उत्तर:- एक काळ असा होता कीं, त्या वेळीं चातुर्वर्ण्यामध्यें इतका कडक भेद निर्माण झाला नव्हता, असें वन्यच उदाहरणां- वरून दिसतें. तथापि जन्मावरूनच चातुर्वर्ण्य पुढे धर्मशास्त्रज्ञांनीं ठरविलें; आणि सध्यांहि त्याप्रमाणेंच मानण्यांत येतें. नवीन शास्त्र - जांनी त्यामध्ये इतकीच जास्त व्यवस्था केली कीं, पूर्वी ब्राह्मणादि त्रैवर्णिकांशिवाय इतरांना मोक्षाचा अधिकार नव्हता, तो सर्वांना N