पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) युरोपीय स्थित्यंतरांच्या प्रक्रियेला सुरवात झाली होती. त्या स्थित्यंतराना भांडवलदारी लोकशाही क्रांति असे ऐतिहासिक नाव आहे. ह्मणजे नवोदित अर्थोत्पादन शक्तींच्या विकासात अडथळा आणणारे जुने अनुत्पादक असे कृषिप्रधान जमिनदारी अर्थकारण उलथून टाकून ज्या सामाजिक उटावाने नव्या सामाजिक संबंधावर नवे भांडवलशाही अर्थकारण उभारिले, त्या । उठावास भांडवलदारी लोकशाही क्रांति असे संबोधिले जाते. १८ व्या शतकात त्या क्रांतिला अंतिम विजय मिळाला असला तरी तिच्या प्रक्रियेला ( Process ) १६ व्या शतकातच प्रारंभ झाला होता. विविध राष्टांचा आह्मी अभ्यास करू लागलो तर आझाला असे आढळून येईल की प्रत्येक राष्ट्रात काही कालाच्या अंतराने अत्यंत परिणामकारक असे महत्त्वाचे बद्दल अवश्य हाणून घडून येत असतात. प्रस्थापित संस्था, परंपरागत सामाजिक संबंध कालांतराने जोर्ण होतात आणि पुढील प्रगतीच्या मार्गात अडथळा करू लागतात. परंतु मानवी मनातील प्रगतीबद्दलची जी सनातन प्रेरणा असते, ती त्या अडथळ्याना धाब्यावर बसवून मानवी जीवनाच्या अनुभवातून जुन्या समाजरचनेत ज्या अभिनव शक्ती निर्माण होतात, त्यांच्या विकासास स्वतंत्रता प्राप्त करून देते. सर्व मानव जातीत या नियमाचा अंमल असलेला आढळून येतो. तेव्हा यूरोपमध्ये ज्याप्रमाणे १८ व्या आणि १९ व्या शतकात जुन्या जीर्ण समाज पद्धतीस उलथून टाकून नव्या उत्पादन पद्धतीवर व सामाजिक संबंधावर नवी समाजरचना उभारू पाहणा-या अभिनव शक्ती उत्कर्ष पावत होत्या, त्याचप्रमाणे परकीय सत्तेच्या अभावी हिंदुस्थानातही वस्तुस्थिति प्राप्त झाली असती. १७ व्या व १८ व्या शतकातील विशेषतः ब्रिटिशांचा पाय या भूमीस लागल्यावेळी-हिंदी सामाजिक वस्तुस्थितीची छाननी केल्यास, आह्मास आदळून येईल की, ज्या सामाजिक शक्तीनी यूरोपची मध्ययुगीन समाजपद्धति उध्वस्त करून आजची भांडवलशाही समाजपद्धति प्रस्थापित