पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२) सणून प्रश्नच राहू शकत नाही. अखिल जनतेच्या जगण्याबद्दलचा तो प्रश्न होऊन बसतो. याहूनही बारकाईने निरीक्षण केल्यास परकीय अंमलाने हिंदुस्थानची कशी हानि केली आहे याचे हुबेहूब चित्र आपल्या डोळ्यासमोर उभा राहील, दोनशे वर्षापूर्वी जेव्हा आपले सांप्रतचे शासनकर्ते या देशात आले, त्यावेळी हिंदुस्थानचा सामाजिक व आर्थिक दर्जा, अर्वाचीन सुधारणेच्या अग्रभागी आज विराजमान होणा-या कोणत्याहि युरोपीय देशाच्या वरचा नाही तरी निदान बरोबरीचा होता, यात शंका नाही. पण आज आपण काय पाहतो? कोणताही युरोपिअन देश भौतिक दृष्ट्या हिंदुस्थानापेक्षा खात्रीने पुढे गेलेला आहे. आजच्या जगात ज्या कित्येक देशांचे वर्चस्व प्रस्थापित झालेले आहे त्या देशापेक्षा हिंदुस्थान देश आर्थिक दृष्ट्या मागसलेला आहे असे विधान केल्यास त्याला पुष्कळ हिंदी जनाकडून विरोध येईल असा माझा विश्वास नाही. दोनशे वर्षापूर्वी अशी वस्तुस्थिति नव्हती. हिंदुस्थान हा त्यावेळी त्या देशापेक्षा आर्थिक दृष्ट्या कदाचित् पुढेही गेलेला असावा. हिंदुस्थानची तत्कालीन प्रगति सर्व साधारणपणे तशीच होत गेली असती, तर हिंदुस्थान देश हा आपला, दर्जी कायम ठेवून जगातल्या इतर देशांच्या पुढे गेला नसता ह्मणून कशावरून १ या विलक्षण वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण दोन त-हेने केले जाते, ज्यानी आपल्या देशची सर्वसामान्य प्रगति थोपविली असे आपले राज्यकर्ते युक्तिबाद लढवितात की अर्वाचीन पद्धती पचविण्याचे सामर्थ्य हिंदुस्थान देशात नाही. आपण केलेल्या हिंदुस्थानच्या हानीचे समर्थन करण्याचा हा वायफळ प्रयत्न आहे. इतिहासाकडे वैज्ञानिक आणि पूर्वग्रहालिप्त दृष्टीने अवलोकन करणा-यांचे दुसरे स्पष्टीकरण आहे. ते सत्यस्वरूप आणि शास्त्रशुद्ध आहे. इतर देशापेशा अर्थकारणात हिंदुस्थान का मागे पडला याचे ते पुढाल कारण देतात. ब्रिटिशानी हिंदुस्थान ज्यावेळी जिंकिला, त्यावेळी यूरोपमध्ये काही प्रचंड स्थित्यंतरे घडून आली, परंतु त्यापूर्वीच निदान दोनशे वर्षे तरी