पान:हिंदी राष्ट्रवाद.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८३ प्रतिगामी राष्ट्रवाद पुढे रेटण्याचे सामर्थ्य पुरोगामी राष्ट्रवादात नव्हते. ते केवळ माक्र्सप्रणीत क्रांतीच्या तत्वज्ञानातच असू शकते.हे तत्त्वज्ञान अद्याप हिंदुस्थानात अवतीर्ण झालेले नव्हते. परंतु · दुधाची तहान ताकावर भागवावी' या न्यायाने बहुजनसमाज महात्मा गांधींच्या दिसायला क्रांतिकारी पण अत्यंत प्रतिगामी अशा सत्याग्रही तत्त्वज्ञानाला बळी पडला. गांधीयुग सुरू झाले. आणि देशाचे राजकारण विचित्र दिशेने वाहू लागले. काँग्रेसमध्ये गांधीवादाचे प्रस्थ माजण्यास प्रारंभ झाला. अर्थात् गांधीवादाचा उहापोह करणे याउपर क्रमप्राप्तच आहे. ते पुढील प्रकरणी.