पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/९७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्या काळच्या सुमेरी पोषाखाचे वर्णन Cambridge Ancient History मध्ये खालीलप्रमाणे दिलेले आहे:-" ही वस्त्रे मेंढ्यांच्या लोंकरचिी विणून तयार केलेली असत. विणतांनाच त्यांना पट्ट्या पाडलेल्या असत, व ती नेसतांना पुरुष कमरेभोंवतीं बांर्धात असत. दुसरें एक वस्त्र उत्तरीयाप्रमाणे ते वापरीत असत. उजवा हात मोकळा ठेऊन खाकेखालून डाव्या खांद्यावर ते बांधलेले असे. म्हणजे आपल्या- इकडील ब्रह्मचान्याप्रमाणेच त्यांचा वेश असे, असे दिसते. या वस्त्राला सुमेरियांत 'गुएना' असे म्हणत. हाच पोषाख सुमेरियन् लोकांपासून बॅब्लिोनी लोकांनी उचलला व परंपरेनें तो पुढे ग्रीक लोकांतहि आला व ग्रीक लोक त्याला 'कौनाके' म्हणत. बायका, दक्षिणी स्त्रियांप्रमाणे डाव्या खांद्यावरून पाठीमागून उजव्या हाता- खालून पदर घेत." याप्रमाणे सुमेरी लोकांचे रूपवर्णन व वेशवर्णन करून मग आपण वेदकालीन आर्य लोकांकडे याच दृष्टीने वळू. आर्यलोक हिंदुस्थानांत अजमासें त्रिस्तपूर्व ४५०० च्या सुमारास आले, हे मागें सांगितलेच आहे. त्या काली त्यांना येथे जे लोक आढ- ळले. ते लोक आर्य लोकांहून भिन्नवंशीय होते. व म्हणून त्यांच्या संबंधींचे स्वरूप- वर्णनात्मक उल्लेख वेदांत काय सांपडतात, ते आपण आतां पाहूं. ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलाच्या २९ व्या सूक्तातः- ____" अनासस्ते दस्यूँरमणो वधेन नि दुर्योन मावृणक मृध्रवाचः ।। म्हणजे, 'हे इंद्रा तूं धर्महीन व नकट्या नाकाच्या दस्यूंना मारून, आर्याना शिव्या देणाऱ्या त्या दस्यूंचा त्यांच्याच घरांत तूं नाश केलास,' अशी इंद्राची प्रार्थना केली आहे. अर्थात् हे दस्यू 'अनास' अथवा नाक नसलेले, म्हणजेच बसवया नाकाचे असत, व या अवगुणामुळे त्यांचा अधिक्षेप करणारे आये चांगल्या सरळ नाकाचे होते, हे ओघानेच सिद्ध होते. परंतु याहुन अधिक स्पष्ट असें अवयवांचें व रूपाचे वर्णन वैदिक ऋषींनी आपले स्वतःचे न करितां आपला श्रेष्ठ देव जो इंद्र, त्याच्या वर्णनाच्या रूपाने केले आहे. इंद्र हा त्यांचा सर्व प्रकारें जातिदेव अथवा राष्टदेव असल्याने, वैदिकनवर्षांच्या मते में उत्तमत्त्वाचे सारसर्वस्व, तें त्यांनी इंद्राच्या ठिकाणी कल्पिलें आहे. यासंबंधी पंडित श्रीनिवास अय्यंगार नांवाच्या एका ग्रंथका- रांनी म्हटले आहे, ते सर्वस्वी खरे आहे. ते म्हणतातः- _ Thy conception of Indra, held by the Rishis was so intensely anthropomorphio, that it is difficult to discover whether, in addition to his divine characterestics, he was also endowed by the Rishis with attributes possessed by historical personages." . (वेदिक ऋषींची इंद्रविषयक कल्पना इतकी आत्मसादृश्यमय होती की, केवळ देव म्हणून काल्पनिक गुणरूपाचे अधिष्ठानच त्यांनी त्याच्याठायीं कल्पिलें होतें, असें नसून त्यांच्यांतील ऐतिहासिक वारपुरुषांच्या प्रत्यक्ष गुणरूपाचीच प्रतिमा त्यांनी इंद्राच्या रूपाने कल्पिली होती, असे वाटू लागते.)