पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/९६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२२) त्याच काळच्या सुमेरी पुरुषाचा पुतळा. हल्लीच्या उच्च आर्यवर्णीयांशी याचे विलक्षण साम्य पहाण्या- सारखे आहे. Sumar frere Ladcart आहे. अंगांत आंतून पोलक्यासारखा काहीं कपडा घातलेला आहे. त्याला गळ्याशी झालरी! पट्टी लावलेली आहे. त्या पोल- क्यावरून एक वस्त्र घेतलेलें आहे; पण तें फरगोलाप्रमाणे शिवलेले आहे का शालजो- डीसारखें नुसते अंगावरून घेतले आहे, हे मात्र स्पष्ट समजत नाही. तथापि पुणेरी बायका पुष्कळ वेळां शालजोडीचे दोनहि कांठ खांद्यांपासून खालपर्यंत पट्टी बरोबर जुळवून सोडतात, तसे सोडलेले आहेत. कोपरापासूनचे हाताचे पुढील भाग उघडे ठेवलेले आहेत. फोटो जरा अस्पष्ट आल्या. मुळे हातांत काही कंकणवलयांप्रमाणे आहे. किंवा नाही हे स्पष्ट समजत नाही; तथापि डोक्यावर काही तरी टोपीप्रमाणे घातलेलें आहे. मात्र त्याची पुढल्या बाजूची सात हजार वर्षांडूर्वीची सुमेरी स्त्री. पट्टी झालरीप्रमाणे कापलेली आहे. तिचा अंगावरील वस्त्राशी काही संबंध आहे किंवा नाही, हे मात्र चित्रावरून कळत नाही.