पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
हिंदी चलनपद्धतीचा इतिहास

charges ) बरेच सोनें इंग्लंडमध्ये गेलें व कांहीं सोन्याचा उपयोग इंग्लंड- मधील स्टर्लिंग रोख्यांत गुंतविण्यांत झाला.

" सुवर्ण निर्गतीविषयी सरकारी दृष्टिकोन "

 १९३२ मार्चमध्यें, नामदार व्हाइसराय साहेबांनी एका भाषणांत असें सांगितलें कीं, ही जी सोन्याची निर्गत होत आहे, ती खात्रीनें हिंदुस्थानास फायद्याची आहे. १९३३-३४ सालच्या बजेटावर लेजिस्लेटिव्ह असेंब्ली मध्ये भाषण करितांना त्या वेळच्या फिनान्स मेंबरनी ( फडणीस) सांगितलें कीं, "अहो सोन्याचे निर्गतीबद्दल येवढी ओरड का करतां त्यांत देशाचे काय नुकसान आहे ? सोन्याच्या ऐवजी तुम्हास रुपये मिळतातच कीं नाहीं ? इतके दिवस तुमचेजवळ जेथें सोनें होतें त्या ठिकाणीं आतां तुमच्याजवळ रुपये व नोटा आल्या त्यांत तुमचें काय बिघडलें ! " अशा रीतीनें हिंदुस्थान सरकारचा सुवर्णाचे निर्गतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तर हिंदी जनतेचा दृष्टिकोन खालीलप्रमाणे आहे:-

" हिंदी लोकमताचा दृष्टिकोन "

 होम चार्जेसकरितां द्यावे लागणारी रक्कम व आयात मालाची किंमत निर्गत मालाचे किंमतींत न भागल्यामुळे तें देणें, सोनें पाठवून फेडणें भाग पडलें. म्हणजे आपल्या कमाईवर आपली उपजीविका न होता मुद्दलांतून उपजीविका करण्याचा एखाद्या कुटुंबावर प्रसंग आल्यास कांहीं कालानें मुद्दल संपल्यामुळे जगण्याकरितां भीक मागणें अगर मरणें येवढे दोन मार्ग त्या कुटुंबास शिल्लक राहतात, त्याप्रमाणेच आपल्या देशांतील मोठ्या प्रमाणावर होणान्या सोन्याच्या निर्गतीमुळे आपल्यावर प्रसंग ओढवेल असे विचारी जनतेस वाटत असल्यामुळे त्यांस ही परिस्थिति फार भीषणावह वाटली. म्हणून सरकारनीं ही परिस्थिति चालू न ठेवितां इतर देशाप्रमाणें येथेंहि सोन्यावें निर्गतीवर निर्बंध ठेवावा व सरकारनें हैं सोने खरेदी करून सुवर्णसंचय वाढवून ठेवावा, असा हिंदी जनतेचा आग्रह