पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुवर्णाची निर्गत

४३

पर्यंत घसरले म्हणजे ऑगस्ट १९३१ मध्ये होते त्यापेक्षांहि १० नी खाली घसरले व डिसेंबर १९३३ मध्ये ८९ पर्यंत आले.
 "गेल्या ५-६ वर्षांतील आयात-निर्यात व्यापाराचे आंकडे तपासले असता असे दिसून येते की, रुपयाचा संबंध स्टलिंगशी जोडल्यापासून हिंदुस्थानला भरीव असा कांहींच फायदा झालेला दिसत नाही. उलट | निर्यात व्यापारांत एकसारखी घट व आयात मालांत एकसारखी वाढ यामुळे तर परिस्थिति अघिकाधिक बिकट होत चालली आहे. आपल्याला ‘होम चार्जेस' करितां प्रतिवर्षी ४० कोटि रुपयांचे वर रक्कम इंग्लंडला पाठवावी लागते; तर १९३२-३३ सालांत व्यापाराचा हिंदुस्थानास अनुकूल असा आढावा ( Fav aurable balance of trade) फक्त ३ कोट रुपयांचे आसपास ! बाकीचे देण्याकरितां आपणास परदेशी सोने पाठवावे लागत आहे. )

" सुवर्णाची निर्गत "

 सन १९२८-२९, १९२९.३० व १९३०-३१ या सालांत सोन्याची आयात हिंदुस्थानांत अनुक्रमें २१ कोटी १२ लक्ष, १४ को, १२ ल, व १२ को. ७५ लक्ष रुपयांची झाली. सुवर्णाचे, निर्गतीस सुरुवात रुपयाचा संबंध १९३१ सप्टेंबरमध्ये स्टर्लिन्गशी जोडण्यात आला तेव्हांपासून झाली. ऑक्टोबर १९३१ ते मार्च १९३२ पर्यंतचे सहामाहींत ५७ कोटि ५७ लक्ष रुपयांचे सोने परदेशी गेले, तर १९३२-३३ सालांत ६५ कोटि ५२ लक्ष रुपयांचे गेले म्हणजे १८ महिन्यांत सोन्याची निर्गत १२३ कोटि ९ लक्ष रुपयांची झाली व ५-२-१९३८ अखेर पर्यंत सोन्याची एकूण निर्गत ३१० कोटि रुपयांचे वर झालेली आहे.

" सोने परदेशी कां गेलें ?"

 थोडक्यात सांगावयाचे म्हणजे हिंदुस्थानांतून सोने गेले, ते धान्य व कच्चा माल यांस मागणी कमी आली व भावहि कमी आले; व परदेशी मालाची आयात वाढली, त्यामुळे इंग्लंडमधील आपले कर्ज वारण्याकरितां ( Home