पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हुंडी-कमी खर्चाचा मार्ग

२१

स्थिर असते, असा अनुभव आल्यामुळे सुवर्ण चलनास सर्वत्र मान्यता मिळाली. सुवर्णचलनामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारास रथैर्य कसे येते, हे पुढील उदाहरणावरून दिसून येईल.
 निरनिराळ्या राष्ट्रातील कायदेशीर चलनांत ( Standard Coin ) सुवर्ण किती असते, हे समजले आणि राष्ट्र राष्ट्रांतील देणे-घेणे शेवट सोन्याच्याच देण्याघेण्यांत घडवून आणले जाते, हे लक्षात ठेविलें म्हणजे वरील गोष्ट आपल्या ध्यानी येते.
 जसे इंग्लंडचे प्रमुख नाणे सॉव्हरीन, फ्रान्सचे फॅक, अमेरिकन संयुक्तसंस्थानांचे डॉलर व जर्मनीचे मार्क, ह्यांची वजने व किंमती (महायुद्धापूर्वी) भिन्न होया, तरी त्यामधील सुवर्णाचा ऐवज निश्चित असल्याकारणाने त्यांचे मोलाचे परस्पर प्रमाण ही निश्चित व सर्वश्रत होते. जसे एक सॉव्हरीन म्हणजे ४.८६ डॉलर, २५.२ फॅक, किंवा २० जर्मन मार्क ह्यामुळे एका राष्ट्रास दुसन्याचे देणे द्यावयाचे असल्यास, किंवा पेढीवाले आणि व्यापारी यांस कर्जफेड करावयाची असल्यास ( वाहतुकीचा व व्याजाचा तेवढा खर्च सोसून ) सोने पाठवून त्या सहज करता येत होत्या. यावरून दिसून येईल की, हुंडणावळीचा दर राष्ट्र राष्ट्रात स्थिर राहून व्यापार व उद्योगधंदे सुरळीत चालण्यास सुवर्ण चलनपद्धतीने अप्रत्यक्ष रीतीने सहाय्य होत असे.

हुंडी-कमी खर्चाचा मार्ग.

 देशांतल्या देशांत हुंडीचा व्यवहार होतो, तो सदरहू पैसे पाठविण्याचा मार्ग सोईचा आणि बेताच्या खर्चाचा असतो म्हणून होतो. एका गृहस्थास सोलापुराहून मुंबईस, तेथील एखाद्या व्यापा-यास त्याचेकडून घेतलेल्या मालाबद्दल पांच हजार रुपये पाठवावयाचे झाल्यास तो ती रक्कम एखाद्या माणसाच्या हातीं आगगाडीने धाडील, किंवा मनीऑर्डरीने पाठवाल, किंवा चेकच्या अथवा हुडाच्या रूपाने पाठवील. ह्य पैकी कोणता मार्ग स्वीकारावयाचा किंवा सदरहू रकमेच्या चलनी नोटा रजिस्टर्ड पोस्टाने पाठवावयाच्या हे वरील गृहस्थ, सोय, सुरक्षितता, आणि पाठवावयास