पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखकाचें निवेदन.


|| पदार्थ मात्र तितुका गेला || नुसता देशाचे उरला ||
येणे करितां बहुताला । संकट जाले ॥ १ ॥

श्रीसमर्थ रामदास.

 श्रीसमर्थांनी हिंदुस्थानच्या तीनशे वर्षांपूर्वीच्या परिस्थितीचें केलेले वरील वर्णन आजहि तंतोतंत कसें लागू पडत आहे, हें आपण, नुसतें हिंदी चलन व हुंडणावळ विषयक सरकारच्या गेल्या ५० वर्षांतील धारेणा- मुळे, हिंदुस्थानचे किती नुकसान झालें आहे, हे पाहिलें तरीहि उत्तम 'तीने दिसून येईल.
 येथील शेतकरी भिकेस कां लागला, कारखानदार कां बुडाले, बेकारी कां वाढली, वगैरे हिंदुस्थानच्या आर्थिक दैन्यावस्थेचे मुख्य कारण पारतंत्र्य व त्यामुळे इंग्लंडच्या व्यापान्यांचे व येथील गोन्या नोकरदार वर्गाचें उखळ पांढरे होण्याच्या दृष्टीने सरकारला ठेवतां आलेले येथील चलन व हुंडणावळ विषयक धोरण हे होय; हे पुढील विवेचनावरून स्पष्ट होईल.
 हजारों देशबांधवांनीं आपणावर संकट परंपरा ओढवून घेऊन गेल्या १० वर्षांत स्वराज्य मिळविण्याकरितां जी जोराची चळवळ केली, व ती शमविण्याकरितां सरकारने जी हिंदुस्थानास १९३५ च्या कायद्यान्वयें घटना देऊ केली आहे; तींतहि चलन व हुंडणावळ विषयक धोरणाचा - साबा परक्याच्याच हार्ती ठेवण्याची योजना केलेली असल्यामुळे, त्या घटने- नुसार हिंदुस्थानला मिळालेल्या सत्तेचा उपयोग, आपली आर्थिक परिस्थिति सुधारणेच्या कामी कसा होऊं शकणार नाहीं, याची कल्पना सामान्य जन सेस येण्याकरतां, या समय- " हिंदी चलनपद्धतीचा इतिहास " कहान पुस्तक लिहिले आहे.