पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[२]

 दुसरे एक कारण असें कीं या विषयावर इंग्रजी भाषेत पुष्कळच लिखाण आहे, परंतु मराठी भाषेत या विषयावर एकत्रित असे फारसें लिखाण नसल्यामुळे सामान्य वाचकांस हा विषय आकलन होण्यास किती कष्ट पडत असतील याची जाणीव लेखकास स्वानुभवाने झाली आहे. तेव्हां सामान्य जनतेस हा विषय आकलन होण्यास सुलभ व्हावे अशा हेतूनें, तसेंच आजकाल नवीन पिढीस मातृभाषेतूनच शिक्षण देणे जास्त श्रेय- स्कर हैं पटत चालल्यानें या विषयावर मातृभाषेत पुस्तकें असणे जरूरीचें वाटल्यानें ही अल्पकृति महाराष्ट्रीय जनतेस सादर करणें अयोग्य ठरणार नाहीं, असें वाटल्यावरून हें साहस लेखक करीत आहे. ते योग्य आहे अगर अयोग्य आहे हें पाहणें जनतेकडे आहे.
 प्रस्तुत लेखकाचे तज्ज्ञ लेखकांनी कारणपरत्वें लेखनद्वारे जे पूर्वीच लिहून ठेविलें आहे, तें त्याच्या अल्पमतीप्रमाणें त्यानें येथें एकत्रित कर- ण्याचा प्रयत्न केला आहे.
 लेखकाचा हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे त्यांत अनेक दोष व चुका असण्याचा संभव आहे. तेव्हां त्यांत असलेले दोष सहृदय वाचक सुधारून गोड करून घेतील व या पुस्तकाची दुसरी आवृत्ति काढण्याचा प्रसंग आल्यास ती निर्दोष करण्यास सहाय्य व्हावे म्हणून, यांतील चुका दिग्द- र्शित करून त्यास ऋणी करतील आशी आशा आहे.
 चलन व हुंडणावळ विषयक धोरणाचा ताबा परक्यांचे हातांत असल्या- मुळे आपले किती नुकसान झाले आहे, व होत आहे याची जाणीव सर्व जनतेस करून देणें अत्यंत आवश्यक आहे व तसें तें करून देण्याकरितां, मासिकेँ व वर्तमानपत्रे यांच्या चालकांनीं अधिकाधिक लिखाण या विषया- वर प्रसिद्ध करण्यास सुरुवात करणें अगत्याचे आहे. तसेंच आमच्या सुशि क्षित वर्गाचे या विषयाकडे अधिक लक्ष लागून त्यांनी या विषयाचा सांगो पांग अभ्यास करून, लेख, व्याख्याने, चर्चा वगैरे मार्गांनी जनतेस या विष याचें ज्ञान करून देणे आवश्यक आहे. सुशिक्षित वर्गाची सध्यांची या विषयाबद्दलची अनास्था अक्षम्य आहे. तरी त्यांनी या विषयाचे महत्व ओळ -