पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
हिंदी चलन पद्धतीचा इतिहास

म्हणतात. एकाजवळ मुबलक प्रमाणांत असलेली वस्तू दुसऱ्याजवळ असतां कामा नये व दुसन्याजवळ मुबलक प्रमाणांत असलेली वस्तू पहिल्याजवळ असतां कामा नये, एकमेकांना एकमेकांच्या वस्तू हव्याशा वाटल्या पाहिजेत आणि या दोघा माणसांची गांठ पडली पाहिजे; या सर्व अडचणी पार पडल्या तरच, त्या दोघांचा एकमेकांशी व्यवहार होणे शक्य होई. ही अडचण ओळखून विनिमय सोपा करण्याकरितां देवघेवीचें सर्वमान्य साधन, म्हणून चलन " प्रचारांत येऊ लागले.

" चलन म्हणजे काय याची अधिक स्पष्ट कल्पना व चलनांची प्रगति "

 चलन म्हणजे तें धातुमयच असले पाहिजे असा सांप्रत सर्वसाधारण समज झाला आहे. ह्याचें कारण उघडच आहे की, आपल्याला लहानपणा- पासून धातूंचेंच चलन वापरणेंची संवय झालेली आहे. कोणत्याना कोणत्या - तरी धातूहून भिन्न पदार्थ चलनासारखा वापरलेला आपणास शहरांत तरी सांप्रत दिसत नाहीं. देवघेवीचें विनिमय सामान्य म्हणजे चलन, जगाच्या निरनिराळ्या भागांत व निरनिराळ्या काळी वेगवेगळें होतें. चामडें, गुरेढोरें, धान्य, फळें, कापड, तेल, अंडी, कवड्या, बदाम, तंबाखू वगैरे निरनिराळ्या सजीव निर्जीव वस्तूंचा चलन म्हणून पूर्वीचे काळीं उपयोग करणेंत आलेला इतिहासावरून दिसून येतो.
 मानव जातीनें प्रथम आपल्या स्थितीला अनुरूप अशा पदार्थांचा उपयोग चलनाचे काम केला; व जसजशी मानव जात सुधारून तिचे रूपांतर समाजांत व राष्ट्रांत होऊं लागलें, दळणवळणाचीं नवीन नवीन साधनें उपलब्ध होऊं लागलीं, तसतशी चलनांत सुधारणा झाली, असें दिसून येतें.
 "शिकारी युगांत, दुसरा पदार्थ विकत घेण्यास मनुष्याजवळ मारून आणलेली शिकारच काय ती असणार; तेव्हां मारलेल्या प्राण्यांचे चामडें हुँच काय तें, आपणास पाहिजे ती वस्तू विकत घेण्याचे साधन त्यांच्याजवळ ..होते. ह्यामुळे त्या काळी चामड्याचें चलन सुरू होतें.