पान:हिंदीचलन पद्धतीचा इतिहास.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
धातूमय चलन

ज्यावेळीं शिकारी अवस्था सोडून मनुष्य गुरेढोरें बाळगून राहू लागला, त्यावेळीं गाई, बैल, शेळ्या, मेंढ्या वगैरे जनावरांचा उपयोग चलनासारखा होऊं लागला. या अवस्थेनंतर मनुष्य शेतकी करूं लागला, त्यावेळी शेतत उत्पन्न केलेल्या धान्याचा देवघेवीचें साधन म्हणून चलनासारखा उपयोग होऊं लागला. परंतु मानव जातीच्या सुधारणेबरोबर, व नवीन नवीन दळणवळणाची साधनें उपलब्ध होऊ लागल्यामुळे ही पद्धति निरुपयोगी भासूं लागली. कारण कवड्या, बदाम वगैरे वस्तूंचा उपयोग चलन म्हणून केल्यास घोडे, हत्ती, सोने, चांदी वगैरे मौल्यवान् पदार्थ घेणें असल्यास गाड्याच्या गाड्या कवड्या व बदाम लागतील.
 फळें, अंडी, कोंबडी, यांचा चलनासारखा उपयोग केल्यास वरील अडचण तर पडेलच; त्याशिवाय, वाहतुकीत तीं सुकून, फुटून किंवा मरून त्यांचे मोलांत कमीपणा येणार. बरें गाई, बैल, घोडे यांचा चलना- सारखा उपयोग करावा तर वरील अडचणींत आणखी एक भर, ती म्हणजे जनावरे कांहीं कापता येत नाहीत. एक बैलास ५ मण ज्वारी असा सौदा ठरल्यास १ मणच ज्वारी पाहिजे असल्यास एक पंचमांश बैल कांहीं कापून देतां येत नाहीं. शिवाय जनावरें हीं जिवंत प्राणी असल्यामुळे, चाळीस पन्नास कोसावरून आपणास पाहिजे असणारे, कापूस, तांदुळासारखें जिन्नस आणणे असल्यास त्या ठिकाणी जाण्यास पूर्वीच्या काळीं पांचसहा दिवस सहज लागत; व हें जनावरांचें चलन इष्टस्थळी पोहोचेपर्यंत त्यास खावयास घालावें लागें, तसें करणें मोठें खर्चाचे होई. कांहीं वेळी त्यांतील कांहीं जनावरें प्रवासांतच मरत. अशा रीतीनें चलन इष्टस्थळी पोहोचणेचे अगोदरच कमी झालें तर हा व्यवहार सोईचा व फायद्याचा कसा होणार !

"धातूमय चलन"

 अशा अनेक अडचणींतून पार पडण्याकरितां मोल, अविनाशित्व, विभाज्यता, वाहतुकीतील सुटसुटीतपणा वगैरे गुणामुळे धातूंचा उपयोग चलन म्हणून होऊं लागला, व चलनाचे लहान लहान भाग करतां आले व आपणास जरूर ती बस्तु, जरूर तेवढीच धातूंचीं नाणी देऊन विकत