पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ
नवम खंड
ज्ञानयोग-व्याख्यान-माला.
एक उघडे रहस्य.

 विश्वांतील वस्तुजाताचे वास्तविक स्वरूप काय आहे याचा उलगडा करण्याकरितां कितीही प्रकारची खटपट आपण केली तरी अखेरीस एक वेळ अशी येते की त्या वेळी परस्परविरोधी सिद्धांत आपणासमोर उभे राहतात. बाह्यतः तरी त्यांचा विरोध इतका स्पष्ट असतो की त्यांची एकवाक्यता आपणास करवत नाही. एखादी गोष्ट आपल्या बुद्धिवादाच्या दृष्टीने ग्राह्य वाटत नाही. तथापि वस्तुस्थितीत तिचे अस्तित्व प्रत्यक्ष दिसत असतें. कालस्थलादिकांनी बद्ध अशा एकाद्या वस्तूचे परीक्षण आपण करीत असतों; नियमबद्ध विश्वाच्या बाहेरची ती नाही हे आपणांस ठाऊक असते; तथापि तिचे परीक्षण जो जो करीत जावें तों तों ती आपणास अधिक अधिक लांब नेत जाते व अखेरीस आपल्या बुद्धीच्या टप्प्याबाहेर ती नाहीशी होऊन जाते. तिच्या कोणत्याही गुणांचा अंत आपणास सांपडेनासा होतो. दृश्य गुणांबरोबर गुप्त गुण तिच्या ठिकाणी काय असावेत याचा अजमासही आपणास करवत नाही. तिच्या ठिकाणचे सामर्थ्य अथवा इतर वस्तूंशी तिचा सापेक्ष संबंध इत्यादि अनेक रहस्ये अखेरपर्यंत आपणास रहस्यरूपच असतात. त्यांचा उलगडा कधीच होत नाही. उदाहरणार्थ एखादें सामान्य फूल