पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२५४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम


रात्म्यांतील अत्यंत दृढप्रेमामुळेच या गोष्टीला ते प्रवृत्त झाले. आपल्या देशाची कीर्ति उज्ज्वल व्हावी अशी खरी इच्छा त्यांच्या हृदयांत नसती, तर या भान गडींत ते कधीच पडले नसते. या भक्तिमान् पुरुषांचा यशोदुंदुभि आपण वाजवू या. कांही झाले तरी आपल्या कल्याणाचा मार्ग त्यांनी आपणांस दाखविला आहे. याकरितां त्यांना नमन करून पुढील कार्यास आपण लागले पाहिजे. हे टीकेचे दिवस संपले ही गोष्ट चित्तांत आणून, आतां संघटनात्मक कार्याची तयारी आपण केली पाहिजे. आजपर्यंत आपण एकमेकांचे दोष मात्र पाहिले आणि एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्याहि आपण काढल्या. आतां हे विनाशक कार्य बंद करून विधायक कार्यासाठी आपण एक झालें पाहिजे. टीकास्त्राने विस्कळित करून टाकलेल्या साऱ्या शक्ति आपण एकव टल्या पाहिजेत. गेली कित्येक शतके आपल्या देशाची प्रगति जागच्या जागीच राहिली आहे. तिचा गाडा आतां आपण पुढे ढकलला पाहिजे. आपल्या मोडकळीस आलेल्या घराची डागडुजी करण्याकरिता काही दिवस तें सोडून देऊन आपण वेगवेगळ्या ठिकाणी रहावयास गेलो होतो. आतां त्याची साफ सुफी होऊन तें रहावयास पुनः योग्य झाले आहे. आर्यांच्या वंशजांनों! तुमचा मार्ग आतां निष्कंटक झाला आहे. त्यावरून पुढे चालत जावयाचें इतकाच कार्यभाग आतां तुह्मांस करावयाचा आहे.
 सद्गृहस्थ हो, या एकाच हेतूने प्रेरित होऊन मी तुम्हांसमोर आज आलो आहे; कोणत्याहि विशिष्ट पंथाचा, मताचा किंवा पक्षाचा मला अभि मान नाही, हे प्रारंभींच तुम्हांला सांगणे इष्ट वाटते. माझ्या दृष्टीने सारेच पंथ मला पूज्य आणि उपयुक्त वाटतात. ते सारेच सारखे मोठे आहेत. त्या साऱ्यांवरच माझे प्रेम असल्यामुळे त्यांत सत्यवस्तु कोणत्या रूपानें वास करते आणि त्यांत चांगला भाग कोणता आहे, हे शोधण्यांतच माझें सारें आयुष्य मी खर्च केले. याकरितां, आपलें एकमत कोठे आहे, ते शोधून काढून तेवढेच मुद्दे तुह्मांपुढे आज मी मांडणार आहे. अशा रीतीने काही सामान्य सिद्धांतांबद्दल ईशकृपेने आपणांत एकवाक्यता झाली तर त्याच्या पायावर पुढील इमारत रचण्याचे कार्य आपण सुरू करूं. जेथें तंटयाचे कारण नाहीं तेवढे सिद्धांत तरी प्रत्यक्ष सृष्टीत आणण्याचा यत्न करूं. आपण सारे हिंदु आहों. हिंदु हा शब्द कोणत्याहि वाईट अर्थाने मी वापरला नाही. यांत वाईट