पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड.]

अभ्यास

१२३


बापा, " अशी हांक मारणे तुम्हांस सयुक्तिक वाटते; पण देव आपल्या अंतर्यामींच आहे अशी आम्हा हिंदु लोकांची खात्री असल्यामुळे परमेश्वराला आकाशांत शोध करणाऱ्या माणसाची कीव आह्मांस येईल. एकंदरीने मुद्दा इतकाच की देशपरत्वें चालू असणाऱ्या रूढीत ढवळाढवळ करण्यास कोणीही मनुष्य सहसा तयार होत नाही.
 आपल्या देहांत ज्ञानतंतूंच्या मध्यवर्ती नाड्या तीन आहेत असे योग्यांचें म्हणणे आहे. यांपैकी एकीचे नांव इडा असें असून दुसरीचें पिंगला असें आहे; आणि या दोहोंच्या मध्ये सुषुम्ना या नावाची नाडी आहे. या तिन्ही नाड्या पृष्ठवंशांतर्गत आहेत. आपल्या पाठीच्या कण्याची जी हाडे आहेत त्यांच्या पोकळीत या तीन नाड्या आहेत. इडा ही उजवीकडे आणि पिंगला डावीकडे आहे. इडा आणि पिंगला हे ज्ञानतंतूंचे रज्जू आहेत. काथ्याच्या बारीक तंतूंचा मोठा जाड दोर वळावा त्याप्रमाणे इडा आणि पिंगला या नाड्या बारीक बारीक ज्ञानतंतूंच्या एकीकरणाने बनल्या आहेत. या दोहोंच्या मधील सुषुम्ना नाडी ही नुसती पोकळी आहे. तिच्यांत ज्ञानतंतूंचे दोर नाहीत. या सुषुम्नेचे द्वार बंद आहे आणि सामान्य मनुष्याला या पोकळ नाडीचा काही उपयोग होत नाही. त्याची सारी देहपरिचर्या इडा आणि पिंगला या दोन नाड्यांच्या द्वारेंच चालू असते. या दोन नाड्यांमधून वायूचें अभिसरण वरून खाली आणि खालून वर होत असते, आणि याच नाड्यांशी शरिरातील दुसरे ज्ञानतंतू जोडलेले असून त्यांच्या द्वारा हुकुमांची नेआण होत असते. शरिरांतील सारी इंद्रिये अशा रीतीने या दोन नाड्यांशी जोड- लेली असतात.
 या दोन नाड्यांच्या कार्यात समतोलपणा आणणे हा प्राणायामाचा मुख्य हेतु आहे. नुसता प्राणायाम ही विशेष महत्वाची क्रिया आहे असें नाहीं; तर त्या क्रियेनें जो हेतु साध्य करावयाचा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. प्राणायामाने पुष्कळशी हवा फुप्फुसांत भरली जाते व तीमुळे रक्त शुद्ध होतें इतकेंच. यापेक्षा त्याचा अधिक उपयोग नाही. आपण आपल्या नाकाने हवा आंत घेतों यांत गुप्त अथवा रहस्यमय असें काय आहे ? हवा आंत घेणे आणि अशा रीतीने रक्त शुद्ध करणे ही क्रिया आपल्या ठिकाणी प्रत्येक क्षणी चालू आहे. हा केवळ गतीचा एक प्रकार आहे. ज्यापासून ही गति अनेक