पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१०८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड. ] हक्क १०३

भिन्न संज्ञा त्यांस प्राप्त होतात. अशा रीतीने या क्रियांची रूपें देशकालानुरूप वेगवेगळी असली तरी त्यांच्या पोटी रहस्य एकच असते. एक शक्ति विघटना करीत असते आणि दुसरी संघटनात्मक असते. एकीच्या क्रियेनें जाती निर्माण होत असतात आणि दुसरीमुळे त्या मोडल्या जात असतात. एकीमुळे वर्गीकरण होऊन उच्च व नीच जाती आणि विशिष्ट प्रकारचे हक्क ही निर्माण होत असतात आणि दुसरीमुळे त्यांचा नाश होत असतो.
 या साऱ्या विश्वाकडे पाहतां तें या दोन शक्तीच्या भांडणाचे रणक्षेत्र आहे असें म्हणावयास हरकत नाही. किंबहुना, या परस्परविरोधी शक्ती अस्तित्वात नसत्या तर हे विश्वही अस्तित्वात आले नसते. संघटनात्मक शक्तीच्या क्रियेविषयी एक आक्षेप वारंवार ऐकू येत असतो. ही शक्ति संघटनात्मक कार्य करीत असते; आणि संघटनात्मक क्रिया म्हणजे सर्वांचे समीकरण, असे समीकरण म्हणजे सर्वत्र शून्याकार अथवा मृत्यूचे साम्राज्य होय हे उघड आहे. याकरितां या शक्तीच्या क्रियेविरुद्ध बनेल ती खटपट आपण केली पाहिजे असे सांगणारे तत्त्ववेत्ते आढळतात. या शक्तीची क्रिया प्रतिरोधावांचून चालू दिली तर विश्वाचा अंत होईल असे त्यांचे म्हणणे आहे. आपणापुढे जे अनेक देखावे दिसतात ते विघटनात्मक शक्तीच्या कार्यामुळे उत्पन्न झाले आहेत. ही शक्ति नष्ट झाली आणि ही सारी विश्वरचना दुसऱ्या शक्तीच्या हाती सांपडली तर ही सारी विविधता नाहीशी होईल आणि ती नष्ट झाली म्हणजे विश्वही केवळ एकरूपाचा एक गोळा होऊन बसेल. विश्वाची अवस्था अशी होऊ नये अशी मनुष्यजातीची इच्छा असणे स्वाभाविक आहे. हाच नियम आपल्या आजूबाजूच्या साऱ्या परिस्थितीला कोणी कोणी लागू करीत असतात. विविधता आहे म्हणून आपण देहधारी आहों. देहांतील ही विविधता नाहीशी होऊन तेथें शुद्ध एकतानता उत्पन्न होणे हाच देहाचा मृत्यु होय. त्याचप्रमाणे समाजांत ही विविधता असणे हे समाजदेहाच्या अस्तित्वास आवश्यक आहे. अशी विविधता समाजांत नसेल तर समाजही मृत्युवश होईल अशी या पक्षाची उपपत्ति आहे. विचाराची विविधता नष्ट होऊन समाजांतील सर्व घटक एकाच प्रकारचे विचार चित्तांत धरून बसूं लागले तर मानसिक शक्ति मृतप्राय होईल आणि सारा समाज अखेरीस अधोगतीच्या मार्गास लागेल अशी भीति या पक्षाला वाटते. याक-