पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/309

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
द्वितीय खंड.

 द्वितीय खंडांत संपूर्ण राजयोग, दुसरी कित्येक व्याख्याने आणि काही खासगी पत्रे यांचा सामावेश होईल. सर्व विद्यांत अध्यात्मविद्या श्रेष्ठ, आणि अध्यात्मविद्येत राजयोग श्रेष्ठ, अशा अभिप्रायाने भगवान् श्रीकृष्णांनी राजयोगास सार्वभौमपद दिले आहे. याच सार्वभौमाला स्वामी विवेकानंदांनी मुकुटराजंदडादि नवी भूषणे स्वहस्ते लेवविली असल्यामुळे तो अतुल तेजानें चमकत आहे. सार्वभौमाच्या भेटीचा योग साऱ्या आयुष्यात एखादेवेळीच येणारा आहे ! आमच्या वाचकांनी ही संधि साधावी.