पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/293

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करता येईल. कोणतेंहि मोठे कार्य अडचणीवांचून सिद्धीस जात नाही, असा नियमच आहे. तुझ्या कल्पनेबाहेर आपल्या कार्यास शेवटी यश येईल अशी माझी खात्री आहे. धीर आणि चिकाटी सदोदित जवळ असली म्हणजे आज नाही उद्यां यश हे येणारच.

 न्यूयॉर्क शहर हे सर्व बाबतीत अगदी मध्यबिंदूसारखे आहे. कोणत्याहि कल्पनेचा प्रसार तेथे झाला ह्मणजे तेथून ती कोळ्याच्या जाळ्यासारखी सर्वत्र पसरते. माझ्या कल्पना पक्क्या रुजविण्यासाठी येथे मला माझें सर्व बळ खर्चावें लागले. वीज चांगले रुजून त्याची मुळेहि खोल गेली आहेत. आता त्याचा मोठा वृक्ष होणे हे फक्त कालावधीचे काम आहे.

 प्राचीन आर्यतत्वज्ञान सोप्या इंग्रजी भाषेत आणणे हे मोठे कठीण काम आहे. पौराणिक ग्रंथांतील दंतकथांची गुंतागुंत सोडविणे आणि नवीन मनुष्यास अगदी भांबावून टाकणारे सिद्धांत साध्या आणि सुलभ भाषेत आणून त्यांच्याद्वारे धर्मास साधे व्यावहारिक स्वरूप देणे हे किती कठीण काम आहे, याची कल्पना, ज्यांनी अशा कार्यास हात घातला असेल त्यांसच येईल. अद्वैतसिद्धांतांतील परोक्षज्ञान प्रत्यक्ष-व्यवहार्य-करता येईल अशा भाषेत समजावून दिले पाहिजे. दंतकथांची गुंतागुंत सोडवून त्यांतील नीतितत्वें सहज रीतीने समजतील आणि ती आचरणांत आणण्याची शक्यता सिद्ध होईल, अशा रीतीने त्या दंतकथांची मांडणी केली पाहिजे. योगमार्ग ह्मणजे सामान्य मनुष्यास अगदी अगम्य, अगदी अव्यचहार्य, किंबहुना त्याज्य अशी जी समजूत झाली आहे, ती बदलून तो व्यवहार्य आहे, कार्यकारण भावांनी वांधिलेलें असें तें शास्त्र आहे, ही गोष्ट साध्या व सोप्या भाषेत सांगितली पाहिजे. एखाद्या लहान मुलासहि समजण्यासारखें स्वरूप या गोष्टींस द्यावयाचे, हीच माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे. यांत मला कितपत यश येईल, हे परमेश्वरास ठाऊक. खटपट करीत राहणे इतकेंच आपल्या हातांत आहे. ती आपण करूं. यशापयशाचा विचार आपला नव्हे. आपल्या अत्युच्च कल्पनांस चिकटून राहणे आणि खरें वैराग्य पूर्णपणे अंगी बाणून ब्रह्मानुभव होईपर्यंत मार्गभ्रष्ट न होणे हे मुमुक्षुस सध्याच्या कनक-कामिनीच्या युगांत अत्यंत दुष्कर आहे.

 येथे माझ्या कामास चांगले यश येत आहे, ही परमेश्वराची कृपा ह्मणावयाची. ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि त्याच जातीचे येथील इतर लोक यांचा माझ्याबद्दल गैरसमज झाला, याबद्दल त्यांसहि फारसा दोषां देत येत नाही. कनक