पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[९]

ज्ञानदीप भरतभूमीने त्यांच्या हस्तें लाविला आहे, त्याच्या योगाने तिच्या मुलांचाच नव्हे तर सर्व सृष्टीचा मोक्षमार्ग प्रकाशित झाला आहे. ता. १९ सप्टेंबर १८९३ पासून ता. ४ जुलै १९०२ पर्यंतच्या कालांत हे सर्व काम त्यांनी केले. ज्या भूमीनें हैं नररत्न आह्मांस दिले तिचा सदा विजय असो । ज्यांच्या प्रेरणेने तें प्रकट झाले ते विजयी असोत ! त्यांनी केलेल्या कार्याचा अंतिम हेतु जाणण्याची बुद्धि आह्मांस नाही.

रामकृष्ण-विवेकानंदशिष्या,

निवेदिता.