पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रथम खंड.

१६१

'केवळ मोठ्या नांवावर भुलू नका' असा उपदेश उघडपणे करणारा महात्मा आजपर्यंत दुसरा कोणीहि झाला नाही. अत्यंत अनासक्त चित्ताने कर्म करून बुद्धाची पदवी मिळविणे तुह्मांसहि अशक्य नाही. साऱ्या जगाला नवे वळण लावण्याचे सामर्थ्य तुह्मांसहि प्राप्त करून घेता येण्याजोगे आहे. हे तुझांस साधलें तर कर्मयोगाचे आदर्श असे तुह्मी व्हाल. 'नर करणी करे तो नरका नारायण होत.' असें सत्पुरुषांनी आश्वासन दिले आहे.

ॐ शांतिः शांतिः शांतिः।

स्वा. वि. ११