पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२४

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

 हिंदुस्थानांत पूर्वी व्यास या नांवाचे एक महर्षि होऊन गेले. वेदांतसूत्रांचे कर्ते अशी यांची प्रसिद्धि आहे. हे मोठे साधुवृत्तीचे होते. यांच्या पित्याने पूर्णत्व मिळविण्यासाठी फार प्रयत्न केले, पण त्यास यश आले नाही. त्याचप्रमाणे व्यासांच्या आजाने व पणजानेंहि प्रयत्न केले, पण त्यांसहि सिद्धि प्राप्त झाली नाही. खुद्द व्यास महर्षीसहि चिरंतन सुखाची प्राप्ति झाली नव्हती; परंतु व्यासांचा पुत्र शुक हा मात्र जन्मतःच सिद्ध होता. व्यासांनी त्याला सर्व अध्यात्म विद्या सांगितली आणि नंतर पूर्णत्वाकरितां त्यांनी त्याला जनकराजाकडे पाठविलें. जनक हा एका मोठ्या देशाचा अधिपति होता. याला विदेह जनक असें ह्मणत असत. विदेह ह्मणजे ज्याचा देहाध्यास संपूर्ण नष्ट झाला आहे असा. जनक हा जरी जन्मतः राजा होता आणि जन्मापासून ऐषआरामांत वाढला होता तरी त्याची देहावरील आसक्ति पूर्ण नाहीशी झाली होती. 'अहं ब्रह्मास्मि' अशी जनकाची सर्वकाल भावना असे. अशा प्रकारच्या त्या राजाकडे शुकाची रवानगी व्यासांनी करून दिली. राजा जनक अंतर्ज्ञानी होता. महिर्षीचा पुत्र आपणाकडे येत आहे, ही गोष्ट त्याला अगोदरच समजली व त्याची परीक्षा पाहण्यासाठी जनकानें कांहीं अगाऊ योजना करून ठेविली. शुक राजद्वारी आला आणि आपणास राजास भेटावयाचे आहे असे सांगू लागला; परंतु देवडीवरील लोकांनी त्याच्या ह्मणण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. तेथेच एक आसन देऊन त्यावर त्यांनी त्याला बसविले. याहून त्यांनी त्याची अधिक कांहीं वास्तपुस्त केली नाही. वास्तविक म्हटले तर तो महर्षीचा पुत्र होता. महर्षीची कीर्ति सर्व देशांत पसरली होती व त्यांस सर्व लोक पूज्य मानीत होते. खुद्द शुकहि मानार्ह समजला जात होता. असे असतांहि त्या देवडीवाल्यांनी त्याच्याशी आडदांडपणाचें वर्तन केलें. शुकमुनी बिचारा तीन दिवस देवडीवरच बसला होता. नंतर त्याच्या आगमनाची वार्ता राजास देवडीवाल्यांनी कळविली. तेव्हां राजा जनक आपल्या मंत्र्यांसह तेथें आला, व महर्षि पुत्राचे त्याने मोठ्या सन्मानाने स्वागत करून त्यास राजवाड्यांत नेल. नतर अंगास सुवासिक उटणी लावून त्याने त्यास मंगलस्नान घातले व त्याचा पूजा केली. इतकें सर्व होत असतां राजा त्याच्याकडे बारीक लक्ष्य लावून पाहा होता; परंतु शुकाच्या मुखावर सुखाची अथवा दुःखाची यत्किचित् छाचार त्याला दिसून आली नाही. दरवाजावर तीन दिवस बसला असतां जी त्याची वृत्ति तीच आतांहि कायम होती. त्याचे पूजन झाल्यावर राजाने त्यास दरबा