पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५१
घरां दारांत कविता

ओळींच्या ओळी डोक्यांत यायच्या. त्या मीं खडूने जमीनीवर उतरून ठेवायाच्या. एखादे वेळेस जवळ टाक नसला की आकपेटीची काडीच दौतीत बुडवून टाकाची भूक काडीवर मी भागवी. सकाळी ठोंबऱ्यांनी ही रात्रीची बिगार कागदावर नोंदवून ठेवावी. असें करतां करतां पावणे तीनशे ओळींची कविता तयार झाली.
ती कविता व एक खरमरीत पत्र टिळकांना पाठवून दिले. ही दोन्ही पत्रे अजून दत्तूनें सांभाळून ठेवली आहेत.*
आमच्या घरादारांत त्यावेळी सारे कविता करीत असत. त्यासंबंधी माझ्या पतिपत्नी कवितेत मी म्हटले आहे.

“न मी एकली, या वायूच्या साह्ये वंशच अवघा

गातो माझा ! ईश्वर डुलतो! म्हणतो आम्हां गा ! गा!
बघ इकडे हा कुमार ताई ! तारुण्याच्या दारी
उभा राहुनी गाई, स्फूर्ती यास कुणाची सारी ?
पहा पोर ही नव वर्षाची नवगीतांना रचिते.
जवळ येऊनी पहा कोण गे! साह्य इयेचे करिते?
पाकागारी चल तूं माझ्या, नवगीते स्वैपाक
रचितो ! गातो! असे मराठी भाषायांची परकी
वर्षे झाली साठ वयाला सखा मनीचा माझ्या
गाउं लागला, वृद्धपणी हा होतो कविंचा राजा
ही कविरत्ने अजुन झांकली पहा आणखी दोन

ये ! ये जवळी! तर्क न करणे बरव ताई दुरून

ह्या कवितेत “ वर्षे झाली साठ वयाला सखा पतीचा माशा गाउँ लागला" म्हणून जो उल्लेख आहे तो रावसाहेब विनायकराव साठ्यासंबंधी आहे. रावसाहेव साठे पेन्शनर होते. ते नगरास येऊन राहिले व नंतर कविता करूं लागले. त्यांचा मुलगा वामन हा फार चांगला चित्रकार होता. तो जर जगता वाचता तर त्याचें नांव चहूकडे गाजलें असते.

  • पहिल्या भागाच्या शेवटी त्यांची छायाचित्रे दिली आहेत.