पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मी एक सूर्यनमस्कार साधक. साधनेत दररोज अनेक सूचना संदेश मिळतात. या सूचनांतूनच उपासना प्रकाशमय होते. प्रत्येकाचे वय, वजन, शरीरप्रकृती, मानसिक वृत्ती, व्यवसाय, साधनेतील अनुभव भिन्न असतात. म्हणून कार्यपुस्तिकेमध्ये दिलेल्या सूचना जेवढ्या झेपतील तेवढ्याच तारतम्याने स्वीकारा. साधनेमध्ये चूक आपली आणि ठपका मात्र शास्त्राला असे होऊ नये. सा व धा न सूर्यदर्शन: हिरण्मयेन पात्रेण सत्य स्यापिहितं मुखम् तत्त्वम् पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये || मैत्री उपनिषद ६ / ३५, - यर्जुवेद ४०/१७ ईशोपनषिद १५ -- हे प्रभो सूर्यनारायणा, या (ब्रह्मांडरूपी) सुवर्ण कलशामधील सत्यधर्मतत्त्व तू अच्छादून टाकले आहेस. (तुझ्या ज्ञानप्रकाश किरणांच्या बोधामृतातून) या आच्छादना पलीकडे असलेल्या शाश्वतधर्मतत्त्वाची दृष्टी मला प्रदान कर. सूर्यनमस्कार एक साधना iv