पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नमस्कार मुद्रा ॐ भास्कराय नमः भास्कर या शब्दाचा अर्थ प्रकाश, तेज असा आहे. जो स्वयं प्रकाशित आहे ज्याची आभा तेजस्वी आहे तो भास्कर. हा भास्कर संपूर्ण विश्वातील सजीव- निर्जिवांचा आत्मा आहे. सूर्य आत्मा जगतस्तस्थूषच्य। सूर्यप्रकाशाने संपूर्ण विश्व व्यापलेले आहे. आपल्या शरीरात व बाहेर सर्वत्र सूर्यतेज आहे. आपल्या सर्व क्रियांचा- कायिक, वाचिक, मानसिक- तो साक्षीभूत परमेश्वर आहे. कर्म- कार्याच्या गुणवत्तेवर तो आपल्याला चांगले वाईट परिणाम प्रदान करीत असतो. त्याचबरोबर श्रेयस कार्य करण्याची प्रेरणा देतो, ते कार्य करण्याची क्षमता देतो, कार्य यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करतो, त्यासाठी सहाय्यही करतो. त्याच्या सूचनांचा स्वीकार केला, सर्व शारीरिक मानसिक क्षमतेने कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण यशाचा 'आत्मारामाचा अनुभव मिळतो, आत्मानंद होतो. हा दैवी आनंद मिळण्यासाठी, आत्मसमाधान मिळण्यासाठी सूर्यदेवतेला वंदन करायचे आहे, नित्य नियमाने अखंडितपणे सूर्योपासना करायची आहे, सूर्यनमस्कार घालायचेआहेत. समर्पणभाव- अतीप्रचंड वेगाने फिरणाऱ्या तप्त वायूचा गोल म्हणजे सूर्य होय. हे अगणित वायूकण महाशक्तीशाली लोहचुंबकाच्या प्रभाव कक्षेत त्याच्याच भोवती वेगाने फिरत असतात. या प्रचंड वेगामुळे लोहचुंबकाची शक्ती अधिक वाढते. महाबलशाली लोहचुंबक व अमर्याद वेग यातून महाप्रचंड ऊर्जा तयार होते. ही ऊर्जा रुद्ररूपी तसेच शांतस्वरूपी आहे. या सूर्यतेजाचे, सूर्यशक्तीचे महात्म्य वरील बारा सूर्यमंत्रांमध्ये थोडक्यात दिलेले आहे. अतीमर्यादित शब्दांमध्ये अमर्याद आशय व्यक्त करतात ते मंत्र. मला समजलेला सूर्यमत्रांचा अन्वयार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा आशय लक्षात घ्या. या महा प्रचंड प्रकाश-लोहचुंबकाला ऊर्जा-गती-तेज देणाऱ्या शक्तीपुढे नतमस्तक व्हा. साष्टांग नमस्कार घाला. सूर्यनमस्कार सूर्यनारायणाची उपासना आहे. उपासना या शब्दाचा अर्थ आहे सेवा करणे, पूजा करणे, चिंतन-ध्यान करणे, अभ्यास करणे थोडक्यात सूर्यनमस्कार एक साधना १९४