पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।।श्रीरामसमर्थ।। मानसिक सूर्यनमस्कार प्रवासात किंवा आजारी असतांना मानसिक सूर्यनमस्काराची साधना करता येते. करन्यास करणे, हाता-पायावरील दाबबिंदू कार्यरत करणे, दीर्घश्वसन, वायूॐ, नादॐ सर्वांगसजगता, नाडीशोधन हे प्रकार अशावेळी सहजच करता येतात. शक्य असल्यास प्राणायामातील इतर प्रकार करण्याचा प्रयत्न करा. सूर्यनमस्कारामधील जे आसन करणे शक्य असेल ते मनाने करा. त्या आसनातील उद्दिष्ट, ऊर्जाचक्र व श्वसन प्रकार याकडे लक्ष देऊन प्रत्येक आसन मनाने करा. आसनामध्ये त्या त्या स्नायुंना मिळालेला हलका ताण - दाब स्वीकारा आसानतील ऊर्जाचक्राच्या सूचना शक्य होतील तेवढ्या व झेपतील तशा अमलात आणा. - औषध-आहार आणि प्राणायाम- सूर्यनमस्कार यांचे ऐक्य झाल्यावर रोग-व्याधी-विकार यातून अल्प कालावधीत कायमची मुक्तता मिळते, हे लक्षात ठेवा. ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ सूर्यनमस्कार एक साधना १६४