पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

||हरिः ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ।। अकालमृत्यु हरणं सर्व व्याधि विनाशनं सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहं । जगातील सर्व समर्थ भक्त व सूर्यनमस्कार साधक यांना माझा साष्टांग नमस्कार. ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग समाप्ती साधना दृकश्राव्य चित्रफित (सीडी) व पुस्तिका (सहभागी साधकांसाठी) मागणी केल्यास स्वतंत्रपणे पाठविण्यात येईल. ।। श्रीरामसमर्थ ।। सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग • प्रशिक्षण वर्गातील पुढील कृती अधिक चांगल्या पद्धतीने करता यावी यासाठी प्रत्येक कृती लक्षपूर्वक करा. • प्रत्येक कृतीमध्ये सूर्यनमस्कार घालण्यासाठी अधिकाधिक स्नायूचे सहकार्य निश्चित करा. • ज्या प्रमाणात स्नायुंवर ताण- दाब दिलेला आहे त्या प्रमाणात त्यांना प्राणतत्त्वाचा पुरवठा करा. ● ताण - दाब दिलेले स्नायू सोडून इतर शरीर तणावमुक्त ठेवा. • ज्या सनयुंना ताण - दाब दिलेला आहे तेच स्नायू मोकळे करण्याचे प्रशिक्षण प्रत्येक कृतीमध्ये आत्मसात करा. ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ सूर्यनमस्कार एक साधना १६२