पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समूहाला किंवा समाजाला परस्पर 'विश्वासा'शिवाय जगताच येणार नाही.शरीरधारणेसाठी श्वास हा जितका आवश्यक आहे तितकाच समाजधारणेसाठी विश्वास हा आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखाद्याचा घरातल्या माणसांवर जर विश्वास नसेल तर त्या घरात तो साधा झोपू शकेल का ? राजे लोकांना कंटकशय्याच लाभते ती यामुळे.
 ३.०३ हल्ली सगळ्या पुढाऱ्यांना संरक्षकाच्या गराड्यात वावरावे लागते ते यामुळेच. धनबादसारख्या कोळशाच्या खाणींच्या मुलखात वावरणारे, कामगारांवर अनभिषिक्त साम्राज्य चालवणारे कामगार पुढारी एका रात्रीत सतत एका खोलीत दोन तासांच्यावर रक्षकांच्या पहाऱ्यातही झोपू शकत नाहीत ! त्यांना झोपण्याच्या खोल्या रोज रात्री वारंवार बदलाव्या लागतात. संरक्षक बदलावे लागतात. सार्वभौम समजल्या जाणाऱ्या गुंड लोकांनाही विचार करण्याची वेळ येते ती अशी की विश्वास तरी कोणावर ठेवायचा? बायकामुलांवर? कुटुंबीयांवर? जातवाल्यांवर? कशाच्या आधारावर? रोजचे वृत्तपत्र वाचले तर सहज लक्षात येईल, की या सर्व समूहात अविश्वासाच्या घटना, खून होणे, फसवणे असे प्रकार मधून मधून घडत असतात, पण बहुसंख्य लोक 'विश्वास' हे सामाजिक मूल्य म्हणून मानतात, त्याप्रमाणे वर्तन करतात म्हणून रोज झोपू शकतात. आपण विश्वासाच्या आधारावर समाजात राहू शकतो.

 ३.०४ पाश्चात्य देशात, अगदी न्यू यॉर्कसारख्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. हिंसक घटना सतत घडत असतात. त्यामुळे सर्व प्रकारची उपभोगाची साधने असूनसुद्धा त्यांना मानसिक शांतता नसते. याचे मूळ कारण सामाजिक व्यवहारातला विश्वासासारख्या नैतिक मूल्यांचा जो मूळ आधार होता तो त्या समाजात ख्रिश्चन धर्मश्रद्धेवर आधारलेला होता. त्याला बुद्धिवादाच्या किंवा निधार्मिकतेच्या नावावर पांगळे करण्यात आलेले आहे. ते सर्व आधार पांगळे व लवचीक करून ठेवले आहेत. एकदा लवचीक, 'रिलेटिव' मूल्यविचार स्वीकारला की व्यक्तीच्या स्वैराचारावर नियंत्रण घालणे अशक्य होते. माझा त्वरित फायदा होत आहे, मी तुम्हाला लुटून जर गबर होऊ शकत आहे तर मी तसे का न व्हावे? या प्रश्नाचे इहवादी, बुद्धिवादी उत्तर पांगळे येते. माझी लूट होऊ नये, माझा खून होऊ नये म्हणून मी तुमची लूट करत नाही किंवा तुमचा खून करणार नाही अशी लिया/दिया वाली स्पष्टीकरणे पांगळीच राहतात. चोरी करणे हा गुन्हा नाही, पकडला गेलात तर चोर अशी पळवाट तयारच असते. ती वाट दाखवणारे पण तयार असतात. न्यायालयात शिक्षा झाली तरच तो गुन्हेगार हे एकदा मान्य केले, की मग कायद्यातल्या पळवाटा, न्यायाधीश

सुरवंटाचे फुलपाखरू १३