पान:सुखाचा शोध.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखाचा शोध. डॉत्तर म्हणाले, “ तरी पण आपण आतां थोडा चहा घ्या. त्यापासून तुम्हांस आणखीहि पुष्कळ घरें वाटेल." डॉक्तर असें हाणतात तोंच चहाच्या टेबलावर चहाची सगळी तयारी झाली. त्या वेळीं कमलाबाई स्वतः चहाचे पेले भरीत होत्या. पेले भरीत असतां त्या ह्मणाल्या, तीसाठीं औषध ह्मणून चहा घेण्यास कांहीं हरकत नाहीं. " 66 प्रकृ- वामनराव म्हणाले, " पण आमच्या येथे चहा घेणें त्यांना पसंत नसेल, तर.. आग्रह करणे हा अन्याय होय. " दिनकर चटकन ह्मणाला, “ छेः ! छे: ! चहा घेण्यास तशी अडचण कांहींच नाहीं. इतक्या आकुंचित वृत्तीचा मी नाहीं. " 66 हें ऐकून मालतीला आनंद झाल्यासारखा दिसला. ती हंसत हंसत ह्मणाली, तर मग आज एक पेला घ्याच." असें ह्मणून तिनें स्वतः एका पेल्यांत चहा ओतून व त्यांत वेतशीर दूध-साखर घालून तो पेला दिनकराच्या पुढे केला. या वेळी दिनकरचा सगळा विवेक जणूं लुप्त झाला आणि त्याने हात पुढे करून तो पेला घेतला. दिनकरनें चहाचा एक घोट घेतल्यावर मालती ह्मणाली, " आणखी साखर पाहिजे ? " दिनकर हळूच हंसून ह्मणाला, नको.' 66 डॉकरनीं मात्र जवळ जवळ अर्धा पेला उदरस्थ केल्यावर बोलण्यास सुरुवात केली. ते ह्मणाले, मास्तर, मालतीनें आज तुझांला चहाची दीक्षा दिली. " वामनराव हंसत हंसत म्हणाले, " त्यांनी तो चहा आराम वाटण्या- साठीं घेतला. यांत दीक्षा ती कसली ? " 66 डॉत्तर म्हणाले, 66 अथवा ' दीक्षा ' ह्मणून म्हटलें, तरी मास्तरची कांहीं त्याला हरकत नाहीं. हळूहळू अनेक गोष्टींची दीक्षा मालतीकडून त्यांना मिळणार आहे. " डॉक्तरचे हे शब्द ऐकून सर्वांना आलें. दिनकरचा आणि मालतीचा चेहरा मात्र लाल झाला. मालतीचा चेहरा लज्जेनें लाल झाला होता आणि दिनकरचा रागानें लाल झाला होता, एवढाच मात्र फरक. दिनकरचा तो