पान:सुखाचा शोध.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण पांचवें. सांगावयाला नको. दिनकरकडे प्रथम वामनरावांची नजर गेली आणि त्यांनी दिनकरला एका खुर्चीवर बसण्याविषयीं सुचविलें. थोड्याच वेळांत मालतीचें तें गाणें ऐकून दिनकर अगदीं तल्लीन होऊन गेला. तिचा तो गोड आवाज आणि म्हणण्याची पद्धत यांमुळे दिनकरला मोठा आनंद झाला. विशेषतः ते गाणें ईश्वराची करुणा भाकणारे असल्यामुळे दिनकरचें चित्त गहिवरून आलें होतें. आणखी दोन अशींच सुंदर पद्ये तिनें झटलीं. मालती इतकें उत्कृष्ट गात असेल, अशी दिनकरची कल्पनाच नव्हती. कांहीं शाळेत जाणाऱ्या मुलींची गाणीं त्यानें ऐकलीं होतीं; पण मालतीच्या गाण्यांत गायन कलेचा बराच अंश असल्यामुळे तें गाणें अर्था- तच डौलदार वाटत होतें. गाणें लवकरच संपलें. पेटी बंद करीत असतां कमलाबाईची नजर दिनकरवर गेली. त्याबरोबर ती हंसत हंसत म्हणाली, “ आं ! मास्तर केव्हां आले ? मास्तर, आज सकाळी येऊन तुझांला परत जावें लागलें ? " ५५ त्या गाण्याच्या विचारांत मग्न असणाऱ्या दिनकरला कमलाबाईचा हा प्रश्न ऐकून नक्षत्र लोकांतून पृथ्वीवर आपटल्याप्रमाणे झालें. तो अडख ळत ह्मणाला, मलाहि सकाळीं रजा पाहिजेच होती. " वामनराव म्हणाले कां ? " (6 66 सकाळीं बरीच सर्दी झाली होती आणि त्यामुळे डोकेंहि जड पडलें होतें. " त्याबरोबर डॉक्तर म्हणाले, ह्मणूनच मी ह्मणतों, आपण चहा पिण्याचा नियम ठेवा. अलीकडच्या दिवसांत चहा हा डॉक्करचें अर्धे काम करतो. 33 66 दिनकर हंसत हंसत ह्मणाला, " डॉक्तरांना पैसे मिळवून देण्याचें कीं, रोग्याचें पैसे वांचविण्याचें ? " दिनकरचा हा प्रश्न ऐकून अर्थातच सगळ्यांना हंसूं आलें. डॉत्तरचा चेहरा मात्र थोडा लाल झाला. वामनराव दिनकरला म्हणाले, " आतां तर तुमची प्रकृति बरी आहे ना ? " “ होय, आतां बरी आहे. "