पान:सुखाचा शोध.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुखाचा शोध. 6 पत्र पाठवून कुशल तर कळवितां आले पाहिजे ना ? प्राणनाथ " प्रियकर ' हैं सगळें शिकल्यावांचून कसे समजणार ? " हे ऐकून सत्यभामा अधिकच लाजली आणि तेथून दुसरीकडे गेली. इतक्यांत बाहेरून उमाचा चार पांच वर्षांचा मुलगा सदू आंत दुडगुड धांवत आला आणि लक्ष्मीच्या पाठविर आपटून 'काकू, मला भूक लागली' असें झणून रडूं लागला. तेव्हां उमा त्याचा हात धरून ह्मणाली, 'चल, मी •तुला जेवायला घालते. पण सदूनें आपला हात हिसकून घेतला आणि 66 जा, आं. तूं नको, मी लक्ष्मीकाकूच्या तो रडण्याच्या सुरांत ह्मणाला, हातानें जेवीन, " ५ , उमा हंसत हंसत ह्मणाली, " अरे गुलामा. लक्ष्मीकाकुंवर एवढे प्रेम बसले का ? आई कोणीच नव्हे. " असें ह्मणून ती लक्ष्मीकडे वळून झणाली, " लक्ष्मी, अशी तुझ्याकडे मोहनी तरी काय आहे ? - त्याला आपली लक्ष्मी पाहिजे. घरांतल्या पोरांना तर लक्ष्मीकाकूवांचून 'घांसहि गिळेनासा झाला आहे. " ज्याला लक्ष्मी यावर कांहींच बोलली नाहीं. ती सदूला घेऊन स्वयंपाक घरांत गेली. इतक्यांत उमाकडे यमुना आली आणि लक्ष्मी कोठें ह्मणून विचारूं लागली. तेव्हां उमा सहज थट्टेनें ह्मणाली, " ज्याला त्याला आतां धाकट्या वैनीसाहेब पाहिजेत. खरेंना यमूनावन्सं १ " उमावैनी, खरेंच सांगा, पोर मोठी गोड ८८ यमूना हंसून ह्मणाली, आहे, नाहीं ? चतुर आणि शहाणी असून इतक्या सालस स्वभावाची मुलगी मी बाई कुठे बघितली नाहीं. पूर्व जन्मीचें सुकृत ह्मणून ही आपल्या घरांत लक्ष्मी आली हो ! " उमा ह्मणाली, " तें खरेंच. बन्सं, मी तिची किती चेष्टा करतें, पण तिला राग ह्मणून नाहीं. कोणतेंहि काम कसें चोख आणि निर्मळ करते. स्वयंपाक तरी किती रुचकर करते. " यमुना ह्मणाली, " आणि पुनः कामाचा कंटाळा ह्मणून नाहीं. कितीहि काम असले, तरी सदां हंसत मुख असते. " लक्ष्मीची ही स्तुति आणखीहि चालली असती; पण तितक्यांत ती