पान:सुखाचा शोध.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण तिसरे. ३५ उमाची सुई भराभर चालली होती. ती आपले काम करीत असतां झणाली, " त्यांत काय मोठेंसें आहे. माझ्या जवळ शीक म्हणजे माझ्याहि पेक्षां चांगली फुले काढशील. लक्ष्मी ह्मणाली, " माझ्या आईला किती तरी तऱ्हेतऱ्हेचें विणकाम करतां येतें. मला ती कांहीं तरी शीक ह्मणून दररोज ह्मणावयाची; पण माझा हातच चांगला चालत नाहीं. उमाताई, माझी आई या वेळी काय करीत असेल, बरें ? ” " तें मी काय सांगू बरें बाळ. तूं सांग पाहूं." 25 " बिचारी माझ्यासाठीं सारखे अश्रू गाळीत असेल. हें ह्मणतां झणतांच लक्ष्मीचे डोळे पाण्याने भरून आले. उमानें लक्ष्मीला आपल्या जवळ घेतले आणि तिच्या पाठीवर हात फिरवून ती ह्मणाली, 'लक्ष्मी, आतां तूं लहान का आहेस आईसाठीं असें डोळ्यांतून पाणी काढावयाला ! मी तर पहिल्या बोळवणीला देखील डोळ्यांतून पाणी काढलें नाहीं." इतक्यांत तेथें हंसत हंसत सत्यभामा आली आणि उमाच्या पुढे एक पुस्तक करून ह्मणाली, "उमावैनी, तुला एक गंमत सांगावयाची आहे. ओळख बरें हें कोणाचें पुस्तक ? " 66 तें पुस्तक हातांत घेऊन उमा ह्मणाली, अगे, ही इसापनीति, समजलें. लक्ष्मीचें वाटतें हैं पुस्तक ? स्वतः भावोजीच शिकवीत असतील ? " हे ऐकून लक्ष्मीचा चेहरा लज्जेनें अगदीं लाल झाला. सत्यभामा ह्मणाली, 'लक्ष्मीवैनी, आतां मराठी संपल्यावर इंग्रजीहि शिकावयाचें असेल ? घरचाच मास्तर. पगार बिगार कांहीं नको. " 66 लक्ष्मी बरीच ओशाळली होती. तरी ती उसने अवसान आणून ह्मणाली, " आणि आपल्याला शिकवायला मास्तर ठेवला आहे कीं, स्वतःच शिकवितात ? " आतां सत्यभामाहि लाजली. ती ह्मणाली, “ मला नाहीं बाई एवढी शिकण्याची हौस. बायकांना शिकून नौकरी थोडीच करावयाची आहे!" उमा हंसत हंसत ह्मणाली, “ नौकरी करावयाची नाहीं; पण त्यांना