Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ सुखाचा शोध. वाटले. मालती इतकी धीट होती हें खरें; पण या वेळीं लजेने तिला कांहीं बोलवलें नाहीं. मुकुंदकडे चोरट्या नजरेनें पाहून ती किंचित् हंसली मात्र झालें ! हीच या विवाहाची मान्यता. यानतर दोघेहि थोडा वेळ : स्तब्ध होतीं. मग मुकुंद ह्मणाला, "तुझाला बरोबर काय काय घ्यावयाचें आहे?” मालती कांहींच बोलली नाहीं; पण ती आंत गेली आणि आपली पुस्तकें व कपडे आणून तिनें दोन पेट्या भरून तयार केल्या. या कात ड्याच्या पेट्या भरावयाच्या वेळेस तेथें कमळाबाई हजर होत्या, आणि त्यांनी या बाबतीत मालतीला कांहीं हरकतहि केली नाहीं, मालतीनें कम- ळाबाईचा जेव्हां निरोप घेतला, तेव्हां तिला फार वाईट वाटलें. आपल्या वापाच्या घरांतून आपण आतां कायमचेंच बाहेर पडत आहों, हा विचार जेव्हां तिच्या मनांत आला, तेव्हां डोळे भरून येऊन तिनें मोठ्या कष्टानें मुकुंदच्या गाडीत पाय ठेवला. आणखी चार आठ दिवस गेल्यावर मालती- चा मुकुंदवरोवर मोठ्या थाटानें सुधारकांच्या पद्धतीप्रमाणे विवाह झाला आणि त्याच दिवसांपासून मुकुंद मालतीसह बंधूपासून निराळा राहूं लागला. आतां या पुढे न शिकतां सवरतां दांपत्यसुखाचा स्वाद यथेच्छ घ्याव- याचा या उद्देशानें मोठ्या आशेनें मालती आपला संसार थाटवीत होती.. हाताखालीं गडीमाणसे असून शिवाय मधून मधून तिची वडील जाऊहि येऊन तिला संसाराची मांडणी करण्यास मदत करीत असे. मुकुंदची वागणुक पूर्ण साहेबी थाटाची असल्यामुळे मालतीनेंहि त्याच दृष्टीने आपला संसार थाटला होता. आपले दिवस या पुढे अत्यंत सुखानें जातील, अशी मालतीला फार आशा होती; आणि सुखाचा शोध करीत असतां आप णास योग्य असा मार्ग सांपडला अशी तिची समजूत झाली होती; परंतु विवाह होऊन चार दोन महिने झाले नाहींत, तोंच तिची आशा हळू हळू ढांसळू लागली आणि पुन्हां तिला निराशेचें भेसूर चित्र दिसूं लागले. यांत मुकुंदचा कांहीं दोप होता असें नाहीं. तो तरी काय करणार ? तो नवीनच ब्यारिस्टर झाल्यामुळे जुन्या व्यारिस्टरांना मागें ढकलून पुढे येण्यासाठीं त्याला नानायुत्क्या योजाव्या लागत व त्यामुळे पुष्कळ ठिकाणी त्याला जावें यावें लागे. सकाळी उठल्यावर त्याला आफिसांत तर गेले पाहिजे ?