पान:सुखाचा शोध.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण बारावें. त्याच्या पुन्हां पूर्वीसारख्या भेटी परत भेटी होऊं लागल्या. आणखी थोड्याच दिवसांनी दिनकरची तत्त्वज्ञानाची परीक्षा झाली. ही परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्यांत दिनकरचे शेटजी महाबळेश्वरी निघून गेले आणि दिनकर दिवाकराला बरोबर घेऊन थोडे दिवस रासपुराला राहण्यासाठी आला. जाते वेळीं मालतीची गांठ घेऊन जावें अशा विचारानें तो तिच्याकडे गेला होता; परंतु ती मुकुंदबरोबर काल्यांची लेणीं पहावयास गेली आहे, हा निराशेचा निरोप ऐकून त्या विचाऱ्याला मुंबई सोडावी लागली होती. दिनकर रामपुराला येण्याच्या आधींच त्याचा विलायतेस जाण्याचा वेत घरांत सगळ्यांना समजला होता आणि त्यामुळे घरांतील बायकांना साह- जिक वाईट वाटत होतें. घरी गेल्यावर आपणास पुष्कळ वरें वाटेल, असे दिनकरला वाटत होते; परंतु मुकुंदबरोबर मालती कार्याला गेली आहे, हे ऐकून त्याच्या मुखावर उद्विग्नता पसरली होती, ती अद्यापीहि कायम होती. तो ज्या दिवशीं रामपुराला पोहोचला होता, त्याच दिवशी त्याच्या वडील बहिणीनें-यमुनेनें- त्याला पहिला प्रश्न हाच केला. ती ह्मणाली, “ दिनकर, पूर्वी घरीं आलास म्हणजे तुंझा चेहरा किती तरी आनंदी दिसत असे; पण या वेळीं तसा कांही दिसत नाहीं. एवढी कसली काळजी तुझ्या मागे लागली आहे ? 66 दिनकर हंसत हंसत ह्मणाला, यमृताई, ही तुझी कल्पना, दुसरें काय ? इंग्लंडांत शेक्सपीयर या नांवाचा एक कवी होऊन गेला, तो ह्मणतो कवी आणि वेडे या दोघांना कल्पनासृष्टिशिवाय दुसरे कांहींच दिसत नाहीं. " यमूताई ह्मणाली, “ दिनकर, हीं तुझीं विद्वत्तेचीं भाषणे आह्मां खेड्यापाड्यांतल्या लोकांना मुळींच समजावयाचीं नाहींतरे बाबा! येथें कांहीं मालतीसारख्या विद्वान् मुली नाहींत. " दिनकर मुद्दामच ह्मणाला. " मालती ? ती कोण ? " 22 आहाहा ! कांहीं माहीतच नाहीं. अरे, ती तुझी शिष्यीण ! जिला तूं मुंबईस शिकवीत असतोस ती ! " “ छेः ! ती आतां माझी शिष्यीण नाहीं. ती स्वतःच आतां दुस-