पान:सुखाचा शोध.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ सुखाचा शोध. तरी भाषण करावयाचें नाहीं, अशा निश्चयानें दिनकर तेथे जात होता व त्याप्रमाणे चार पांच दिवस त्या क्रमाने त्याचे गेलेहि; परंतु दिनकरची ही मूकवृत्ति मालतीला सहन झाली नाहीं. मुलांना शिकवून दिनकर घरी जाण्यास निघाला असतां मालतीने मुद्दामच त्याची गांठ घेतली. ती हंसत हंसत म्हणाली, “स्टेट स्कॉलरशिप मिळाल्यावर आपण विलायतेस जाणार ना ? नाहींतर तुमचे जुन्यामताचे मित्र वेळेवर आडवे यावयाचे ? << दिनकरचें मन पुन्हां विरघळले. तो ह्मणाला, माझी मित्रमंडळी अशी अनुदार मताची नाहीं. पूर्वी मला स्वतःलाच विलायतेस जाण्याची इच्छा नव्हती; परंतु आतां दोन कारणासाठी मी तिकडे जाण्याचे मुद्दाम ठरविले आहे. " स्मित करून मालती म्हणाली, "अशी कोणती दोन कारणें तीं ? " मालतीकडे खाँचदार दृष्टीने पाहून दिनकर ह्मणाला, " ज्ञानविज्ञान विभूषिता सरस्वती देवीचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन पावन व्हावें, ही एक इच्छा आणि " " आणि म्हणून थांबलांत कां ? दुसरी कोणती इच्छा ? " “ कांहीं विलायतेस जाऊन आलेले तरुण इकडे आल्यावर जो थापे- बाजीचा धंदा करीत असतात, त्यांत कितपत तथ्य आहे, हेहि पाहण्याची माझी इच्छा आहे. " असे म्हणून आपल्या शब्दाचा काय परिणाम झाला, हे पाहण्यासाठ दिनकरनें आपली दृष्टि मालतीच्या मुखावर वळविली. हे शब्द मुकुंदच्या संबंधानेंच वापरले आहेत, हे लक्षांत येऊन मालतीचा चेहरा थोडा लाल झाल्यासारखा दिसला. दिनकर पुढे तेथे थांवलाच नाहीं. तो चटकन् घरीं निघून गेला. याचा परिणाम मालतीवर मात्र निराळाच झाला. तीन चार दिवस ती दिनकरशीं कांहीं बोललीच नाहीं. पुढे दिवाकर शिकविण्यास जाऊं लागल्यामुळे पंधरा वीस दिवसांत तिची आणि दिनकरची गांठहि पडली नाहीं. शेवटीं मालतीनें पुन्हां आपलें तें लेखणीचे हत्यार उचललें आणि पूर्वीसारखेच गोड मजकुराचें पत्र दिनकरला लिहिले. या पत्रानें दिनकरचें हृदयक्षत थोडें थोड़ें भरून येऊं लागले. मालतीच्या आणि