Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६ सुखाचा शोध. आहे. पाश्चात्यांचे प्रत्येक बाबतीत अनुकरण करून हिंदुसंस्कृतीला नांवें ठेवणे म्हणजे आपले मस्तक दगडावर आपटून दगड फोडण्याचा हास्या- स्पद प्रयत्न करणे होय. अशानें दगड़ न फुटतां मस्तकाला मात्र टेंगळे यावयाची आणि ही गोष्ट सुधारकांत जे कांहीं किळसवाणे प्रकार दिसतात, त्यावरून स्पष्ट झाली आहे. त्यांची सदुद्यमशीलता आम्ही न घेतां त्यांची व्यसने मात्र घेतली. त्यांची मर्दुमकी न घेतां मगरुरी मात्र घेतली. त्यांचें साहस आणि कंटकवृत्ति हीं न घेतां ऐपआराम मात्र घेतले. त्यांची जिज्ञासा आणि कल्पकता न घेतां विषयलालसा मात्र घेतली. त्यांचें देश- प्रेम आणि स्वातंत्र्याची आवड हीं न घेतां नारकीय प्रेमाचे आम्ही उपा- सक मात्र झालो. एकंदरीनें हैं अनुकरण आम्ही इतक्या अध दृष्टीने केले आहे कीं, आमचा समाज म्हणजे शक्तिउपासक मंडळ होय, असें म्हण ण्याची पाळी आली आहे. " मिस्तर भार्गव यांना वामनरावांचे हे विचार अर्थातच पसंत पडले नाहींत. वामनरावांनी हे आरोप जणूं आपणावरच केले, असं त्यांना वाटले आणि म्हणून चांगले सणसणीत उत्तर देण्यासाठी ते डोकें खाजवूं लागले; पण कांहीं जुळलें नाहीं. शेवटीं ते मोठ्याने हंसून म्हणाले, "वाः वामनराव ! आपणाला पुराणवादीमंडळानें वकीलपत्र दिले आहे, असे दिसते ? " प्रोफेसर मंडपे म्हणाले, “ छे:, छे:! यांत पुराणवादीमंडळाचा कांहीं संबंध नाहीं, आणि असला तरी त्यांत वावगे असे काय आहे ? त्यांच्यांत कांहीं दुराग्रहि आहेत ही गोष्ट खरी; परंतु एकंदरीनें जुना समाज आपली आर्यसंस्कृति न सोडतां त्यांत पाश्चात्यांच्या योग्य संस्कृतीची भर घालण्या- कडेच त्यांची प्रवृत्ति दिसते. आम्ही मात्र तसे करीत नाहीं. जुनें वाईट आणि नवें चांगले अशा पक्षपाताने आम्ही वागतो. खरे पाहिले असतां आपली संस्कृति चांगली की वाईट याचा संशय आतां पाश्चात्यांनाच वाटूं लागला आहे. 'मॉडर्न खिश्चानिटी' या नांवाचे एक पुस्तक एका विद्वानानें लिहिले आहे. येशू ख्रिस्त जणूं पुन्हां अवतीर्ण होऊन न्यूयार्क शहरांत जाऊन तेथे पूर्वीच्या त्या अत्यंत तेजस्वी अशा संस्कृतीचा शोध