पान:सुखाचा शोध.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दहावें. १३५ जरी त्यांनी अभिवचन दिले आहे, तरी त्यांनी आपली संस्कृति तुमच्यावर बलात्कारानें लादण्याचा प्रयत्न केला, अशी कल्पना केली, तरी आह्मां आर्याच्या संस्कृतीचा पाया अभंगच राहील असे दिसून येईल. बुद्ध युगांत आम्ही बुद्धधर्मीयांच्या कांहीं चांगल्या चालीरीति घेतल्या आणि त्या आप- ल्याशा केल्या आहेत. मुसलमानांपासूनहि कांहीं चांगल्या गोष्टी घेतल्या आहेत. तसेच पाश्चात्यांपासूनहि त्यांचे चांगले तेवढे आम्ही ग्रहण करूं; परंतु यावरून हिंदूंची उच्च संस्कृति नाहींशी होईल, अशी मात्र कोणी आशा करूं नये. " मिस्तर गोविंदराव विकृत स्वरानें म्हणाले, " पण आमची ही हिंदु- संस्कृति नाहींशी करण्याचा आम्हीच कां प्रयत्न करूं नये ? " वामनरावांना निरुत्तर करणारा प्रश्न आपण केला, असें गोविंदरावांना चाटलें व ते मोठ्या तोयनें श्रोतृसमाजाकडे पाहू लागले, वामनराव म्हणाले, " ती नाहींशी व्हावी अशी आपली इच्छा असेल आणि तुमच्या- प्रमाणें दुसरेहि कांहीं तिलांजलि घेऊन उभे आहेत; परंतु त्या बरो- बर जगाच्या इतिहासाकडेहि लक्ष पुरविले पाहिजे. जें मरण्याच्या किमती- चें आहे, तें मरतें आणि जें जगण्याच्या किमतीचें आहे ते जगतें असा सृष्टीचा नियम आहे आमची आर्यसंस्कृति इतकी जिवट आहे कीं, तुमच्यासारख्या नरपुंगवांनी तिच्यावर वज्रप्रहार केले, तरी ती अभंगच " राहणार. प्रोफेसर मंडपे म्हणाले, " वामनरावांचेंच ह्मणणे सयुक्तिक दिसतें. इतिहासांत अनेक जातींचा उल्लेख आढळतो; पण त्या जातींचें अस्तित्व आज कोठेंहि आढळून येत नाहीं. मोठमोठीं राज्ये लयास जाणें निराळें आणि एके काळीं देशचा देश पददलित करणारी जात नाहींशी होणें निराळें, या जाती नाहींशा झाल्या याचा अर्थ हाच कीं, त्या त्यांच्या जव ·ळच्या उच्च संस्कृतीनें भूषित झालेल्या जातींत विलीन झाल्या. हिंदू- संस्कृतीचा इतिहासहि असाच आहे. या उच्च संस्कृतीनें भरतखंडांत अनेक जातींना आपल्या पोटांत घेतले आहे." वामनराव म्हणाले, “ मी तरी माझ्या लेखांत हेंच प्रतिपादन केलें