पान:सुखाचा शोध.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ सुखाचा शोध. प्रकरण दहावें. मुंबईस चौपाटीच्या बाजूला असलेला एक सुंदर बंगला सहस्रावधि विद्यु- द्दीपांनी प्रकाशमान् झालेला असून त्याच्या सभोवती असलेल्या बागेतहि मधून मधून मोठाले दिवे लावले होते. बागेच्या दरवाजासमोर गाड्या • मागून गाड्या येत होत्या आणि त्या गाडयांतून नीटनेटका भपकेबाज पोषाख केलेले स्त्रीपुरुष बंगल्यांत जात होते. ज्या बंगल्यांत आज एवढा दीपोत्सव चालला होता, तेथें असें होतें तरी काय ? असे जर कोणी विचारले, तर कांहीं विशेष नाहीं, असें खरोखरच सांगावें लागेल. पण मोठ्या लोकांचे सगळेच मोठें या न्यायानें त्यांच्या घरी सहजा- सहजी देखील दिपोत्सव होतात. या बंगल्याच्या बागेला दोन फाटके असून एकावर इन ( आंत ) आणि एकावर औट (बाहेर ) असे लिहिले होतें. तसेंच या अक्षरांच्यावर एका बाजूला इंग्रजीत दिलखुपगार्डन आणि दुस- ज्या दरवाजावर मराठीत दिलखुपवाग असे लिहिले होतें. या बंगल्याच्या मालकाचें नांव मधुसूदन महादेव भार्गव असे असून तें दर्शविण्यासाठीं पितळेच्या पत्र्यावर कोरलेल्या अक्षरांची पाठीहि फाटकावर लावली होती. त्या पाठीवर इंग्रजीत एम्. एम्. भार्गव असे नांव होते आणि या गृह- स्थालाहि तेच नांव आवडत असे. मधुसूदनराव असे कोणी म्हटले किंवा तसे नांव लिहून त्यांना कोणीं पत्र लिहिले, तर त्यांना राग येत असे. त्यांचें टोपणनांव आण्णासाहेब असें होतें. हें नांव त्यांना आवडत होतें; पण मिस्तर भार्गव या नांवावर त्यांचे विशेष प्रेम होते आणि त्यांचे सर्व इष्टमित्र त्यांना मिस्तर भार्गव हाणूनच हांक मारीत असत. यांचे वडील महादेवराव भार्गव हे अव्वल इंग्रजी अमदानीत मोठ्या हुद्यावर असून त्यांनीं विपूल पैसा मिळविला होता. पुष्कळ दिवस महादेवरावांना संतती अशी झाली नाहीं. परंतु देवाच्या कृपेनें वृद्धापकाळी त्यांना दोन लाभ झाला. लग्न करून कांही दिवसांनी संसार ऐन रंगास आला की, बायको मरावी, असे महादेवरावांच्या मार्गे दुर्दैव लागले होते; पण वृद्धाप चा