प्रकरण नववें. १२७ लग्ने वगैरे व्हावयाची आहेतच. तुझी संधी साधून वामनरावांना पुन्हां एकदां गळ घाला आणि आणखी पांच हजार रुपयांचा विमा उतरा- वयाला लावा. झणजे मुंबईसारख्या ठिकाणी दहा हजार रुपयांत कसावसा निर्वाह चालेल." "हो, पण हे त्यांनीं एकले पाहिजेना ! हप्ते भरण्याची अडचण त्यांच्या- कडून पुढे येईल; पण तसे केल्यावांचून कांहीं इलाज नाहीं, हेंहि खरें." “ मालतीसाठी पोस्टाच्या ब्यांकेत दरमहा काहीं पैसे वामनराव ठेव- तात, असें मीं ऐकलें आहे, तेच पैसे या विम्याच्या हप्त्याला खर्च करा, असे सांगा ह्मणजे झालें. ह्मणजे एका टोल्याने दोन पक्षी मारल्याचे श्रेय येईल.” पोटांत दुखत असल्यामुळे आंथरुणावर पडून कण्हत असलेल्या कम- ळाबाई हळू हळू उठून बसल्या, त्यांचा आवाजहि चढला. मधून मधून त्या हंसूंहि लागल्या. अगदीं आवडता विषय जेव्हां सुरू झाला, तेव्हां तर त्या पलंगावरूत उठून डॉक्तर शेजारींच खुर्ची घेऊन बसल्या. डॉक्तर- नींहि अघळ पघळ बोलण्यास सुरवात केली. बोलण्याच्या रंगांत या दोन कृष्णाकृति केव्हां अगदीं संलग्न होत, केव्हां केव्हां विलग होत. त्या दिवशीं त्या अर्धवट अंधाराच्या जागेत एक प्रचंड छाया दिनकरच्या दृष्टीस कशी पडली आणि नंतर एका छायेच्या दोन छाया कशा झाल्या, हें गूढ आतां वाचकांच्याहि चांगले लक्षांत आले असेल. पूर्वी एक वेळ परिचारिकेचा धंदा करीत असलेल्या कमळाबाई आणि त्याच वेळी त्यांच्या परिचयाचे झालेले डॉत्तर नीलकंठराव यांच्या पूर्वस्मृतीनें अधिक रमणीय वाटणाऱ्या गप्पा जेव्हां सुरू झाल्या, तेव्हां आपले शारीरिक दुःख कमळाबाईनी व मानसिक दुःख डॉक्तरसाहेबांनी विसरून जावें यांत कांहीं मोठेसे नवल नाहीं. दोघांसहि बोलण्याचा शीण बराच झाल्यावर कमळाबाईनी खास स्वतःचें कपाट उघडून थोडें लाल रंगाचें पातळ औषध डॉक्तरना देऊन थोडें आपणहि घेतले. यानंतर दोघांचे बरेंच बोलणें झालें; पण या किळस- वाण्या प्रसंगाची आतां रजा घ्यावी हेच उत्तम.
पान:सुखाचा शोध.pdf/१२७
Appearance