Jump to content

पान:सुखाचा शोध.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण आठवें. ११३ नाहीं. गोन्या लोकांविषयीं तरुण सुशिक्षित विद्यार्थ्यांच्या मनांत कसा द्वेष उत्पन्न होऊं लागला आहे, हे माझ्या या उदाहरणावरून आपल्या ‘ न्यायपत्रिकें ' त तो सिद्ध करणार होता आणि त्यासाठीं तो मला जबर शिक्षा ठोठावणार होता. रेलवे कंपनीने त्याला आपल्या मुठीत ठेवलेला आहे. कंपनीने त्याला पहिल्या वर्गाचा पास दिलेला आहे. स्वारी भयं- कर लांच खाऊ आहे, असा त्याच्याविषयी फार बोभाटा झाला आहे ! त्याच्या कोणत्या गुणावर लुब्ध होऊन सरकारनें न्यायसूत्रे त्याच्या हातांत ठेवली आहेत, हें ईश्वरास माहीत. " वामनराव म्हणाले, दुर्दैवानें या गृहस्थांसमोर जर तुमचा खटला सुनावणीस निघाला असता, तर तुझांला बराच त्रास झाला असता ? " 66 " नाहीं. कांहीं विशेष नाहीं. हा खटला त्या म्याजिस्ट्रेटसमोर न चालतां धुळ्याच्या म्याजिस्ट्रेटसमोर चालावा, अशी नारायणराव जोशी यांनीं बरीच खटपट केली होती आणि तिला बरेंच यशहि आलें होतें; पण ही फिर्यादच काढून घेतल्यामुळे पुढे कांहीं तजवीज करण्याचें कार- णच पडलें नाहीं. " चिरूटाची राख झाडून डॉत्तर म्हणाले, नारायणरावांच्या या खट पटीला यश आले नसतें आणि रेलवे कंपनीने फिर्याद काढून घेतली नसती, तर आपणावर अर्थात् तुरुंगांत जाण्याचा प्रसंग आला असता. • मास्तर, जेथें तेथें असें शौर्य प्रगट करणें बरें नव्हे, " 66 डॉक्तरचे हे शब्द ऐकून सगळ्यानींच किंचित् तिरस्काराने डॉक्तरकडे पाहिले, मालती तर रागानें लाल झाल्यासारखी दिसली. ती ह्मणाली, “ प्रसंग येऊन ठेपला असतां, पुढचा मागचा विचार शांतपणे करण्यांत वेळ घालविल्यास प्रसंगाचे निवारण केव्हांहि व्हावयाचें नाहीं. अनेक महत्कार्याशी संकटांचा संबंध असतोच. तेव्हां केवळ संकटाकडे पाहून जर हीं महत्कार्यै सोडली तर त्यांत पुरुषार्थ कोणता ? " वामनराव हंसत हंसत म्हणाले, " डॉक्तरसाहेबांचें ह्मणणें असें दिसतें कीं, चोर चोरी करीत असला, तर सोटा घेऊन त्याच्या मार्गे न लागतां