११२ सुखाचा शोध. काढून टाकले. अर्थात् या बाबतींतहि दिनकररावांचाच जय झाला, असे झटले पाहिजे. " " ठीक ठीक !” असें ह्मणून डॉक्तरनी आणखी चार दोन चहाचे घोट घशाखाली ढकलले. दिनकर हंसत हंसत ह्मणाला, " सर्व ठीक झाले; 35 पण या बाबतीत दोन व्यक्ति फारच निराश झाल्या. डॉक्कर ह्मणाले, " या दोन व्यक्ति कोणत्या ? " एक म्याजिस्ट्रेटसाहेब आणि दुसरे स्टेशनमास्तर काळा अदमी झटला की, त्या स्टेशनमास्तरच्या पायाची आग मस्तकाला जाते. उतारूंनी थोडी देखील तक्रार केलेली त्याला सहन होत नाहीं. रेलवे कंपनीच्या कोणाहि गोया नौकरानें वाटेल तो जुलूम केला, तरी तो उतारूंनी सोसला पाहिजे अशा विचाराचे हे स्टेशनमास्तर आहेत. मी त्यांच्या हाती सांपड- ल्यावर मोठी शिकार सांपडली असे त्यांना वाटले. आह्मां सगळ्याच विद्यार्थ्यांशीं तो जेव्हां उद्धटपणानें बाधूं लागला, तेव्हां' तूं आम्हाला कोण समजतोस ? ' ह्मणून एकानें त्याला प्रश्न केला. त्यानें यावर उत्तर दिले, 'तुम्ही कितीहि इंग्रजी शिवलेले असला, तरी तुझांला गुलामापेक्षा अधिक किंमत मी देणार नाहीं.' हे त्याचे शब्द ऐकून मी त्याच्यावर फारच गरम झालो. ‘ रेलवे कंपनी ही उतारूंची सेवावृत्ति करणारी एक कंपनी आहे आणि त्या कंपनीचा तूं नौकर आहेस. अर्थात् तूं आह्मां गुलामांच्या नौकराचा नौकर आहेस, ' असे मला शेवटी त्याला सांगावे लागले, " दिनकर ही हकीकत सांगत असतां इकडे डॉक्तरनी आपला चहा गट्ट केला होता. ढेकर देऊन व चिरूटाचे दोन झुरके घेऊन ते म्हणाले, " ज्यांच्या भाड्याच्या पैशावर या लोकांचा निर्वाह होत आहे, त्या उता- रूंशी हे किती बेपर्वाईनें वागतात ! " मालती ह्मणाली, " स्टेशनमास्तर शिवाय दुसरी कोणती व्यक्ति निराश झाली ? " 66 दुसरे ते ऑनररी म्याजिस्ट्रेटसाहेव रावसाहेब, रावबहादूर होण्या- साठी त्या बिचायाची सारखी धडपड चाललेली असते. न्यायानें वा अन्यायानें सरकारला खुष करण्याचा एकहि प्रसग तो वांया जाऊं देत
पान:सुखाचा शोध.pdf/११२
Appearance