प्रकरण आठवें. १०५ संपली आणि मग हा या मानसिक प्रेमाच्या मागे लागला आहे, तर याला आम्हीं नांवें ठेवलीं नसतीं; पण विवाहित स्त्रीला विपन्नावस्थेत टाकून ‘ सिस्टर्स अँड ब्रदर्स' म्हणून समाजोन्नतीसाठी आपल्या मानसिक प्रेमाचें प्रदर्शन करण्यास निघाला आहे. दिनकर, खरें सांग. तुझ्या स्त्रीचें तुझ्या- वर जें प्रेम आहे, त्या प्रेमाला तूं तामसिक प्रेम समजतोस ना ? " 66 पांडुरंगानें हा शेवटचा प्रश्न दिनकरला इतक्या गंभीर व खणखणीत स्वरानें केला कीं, तो ऐकून दिनकरचें अंतःकरण थरारल्यावांचून राहिले नाहीं. तो कांहींसा गोंधळून म्हणाला, त्या प्रेमाला काय म्हणावें, तें मला निश्चितपणे सांगतां येत नाहीं; पण तें उच्च प्रकारचें प्रेम कांहीं म्हणतां येणार नाहीं. तें केवळ लौकिकप्रेम होय. गतानुगतिक असे देखील म्हणतां येईल. " पांडुरंग पुन्हां पूर्ववत त्वेषाने म्हणाला, " अशी जर तुझी समजूत असेल, तर दिनकर, तुला मी आज स्पष्ट सांगतों कीं, तुझ्या डोक्यांत भलतेच वेड शिरलें आहे आणि या वेडाला जर तूं चिटकून राहिलास, तर मानसिक सौख्याची आणि तुझी केव्हांच गांठ पडणार नाहीं. कल्पवृक्षाच्या छायेंत बसूनहि मूर्ख जसा दरिद्री राहतो किंवा कामधेनू जवळ असूनहि उपाशीं मरतो, त्याप्रमाणें तुझ्या घरांत सुखाचा गड्डा असून तूं वेड्या- प्रमाणें सुखाचा शोध करीत हिंडत आहेस. आज तुला ती देवतेप्रमाणें पवित्र अशी गृहलक्ष्मी तामसिक प्रेमाची पुतळी वाटत आहे; पण असा एक दिवस उगवेल कीं, तिच्यासाठी तुला अश्रू ढाळावे लागतील." यानंतर सगळेच थोडा वेळ स्तब्ध बसले होते. दिनकरचा चेहरा तर बराच म्लान झाला होता. तो खिन्न होऊन बसलेला पाहून या तिघांनी तो विषय तसाच सोडला आणि पुढील शिक्षणासंबंधाने त्यांच्यांत बाद- विवाद सुरू झाला. दिनकरनें एम्. ए. च्या परीक्षेत गणित व संस्कृत यांत चांगलाच लौकिक मिळविलेला असल्यामुळे त्यानें विलायतेस जावें, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणें होतें; परंतु पैशाची अडचण दाखवून दिन- करनें त्या बाबतींत नन्नाचा पाढा वाचण्यास आरंभ केला होता. केव्हां केव्हां त्याला जावें असेंहि वाटे; पण मालतीपासून सहा हजार मैलांवरच्या सु० शो०...७
पान:सुखाचा शोध.pdf/१०५
Appearance