१०४ सुखाचा शोध. होत नाहीं ना ? आकाशांत उज्ज्वल तारका दृष्टीस पडल्यावर तिच्याकडे कौतुकानें तुम्ही पहात नाहीं ना ? " " कविवर्य, आपलें हैं कवित्व राहूं द्या. दुरून येणाऱ्या सुवासाच्या लहरीनें तुझें समाधान होणार नाहीं. तें फूल तोडून मस्तकावर धारण करण्यापर्यंत तुझी मजल गेली आहे. " “ माझी इच्छा कशीहि असो; पण वस्तुस्थितीकडे थोडे लक्ष द्याल कीं नाहीं ? आकाशांतली तारका केव्हां कोणाच्या हाती लागली आहे ? " " ती हातीं लागणें न लागणें हें निराळें; पण मालतीविषयीं तुझ्या मनांत प्रेम उत्पन्न झाले आहे कीं नाहीं, तें सांग पाहूं ? ११ ८८ ही गोष्ट मी नाकबूल करीत नाहीं; पण प्रेम म्हटले की, तेथें सगळे वाईट हेतु असतात, असें तुम्हाला कां वाटतें ? मित्रप्रेम, बंधुप्रेम, मातृ- प्रेम, हदि एक प्रकारचें प्रेमच आहे. माझ्या समजुतीप्रमाणें प्रेमाचे तीन प्रकार आहेत. एक शारीरिक प्रेम. हें अर्थात् निकृष्ट असतें. पतिपत्नीचें प्रेम हें शारीरिक प्रेम होय. मानसिक प्रेम हें शारीरिक प्रेमापेक्षां उच्च असतें. स्वदेशप्रेम, बंधुप्रेम, हें मानसिक प्रेम होय; आणि तिसरें अत्यंत उच्च असें आध्यात्मिक प्रेम होय. जगाला विसरून जाऊन केवळ परमे- श्वराच्या ठिकाणीं लीन होणें हें आध्यात्मिक प्रेम होय. अर्थात् माझें मालतीवर जें प्रेम आहे, तें मानसिक प्रेम होय. या प्रेमाला इन्टलेक्युअल लव्ह असेंहि म्हणतां येईल. " या वेळीं रामभाऊनें हियर हियर ' ह्मणून टाळ्या वाजविल्या. नंतर तो ह्मणाला, तुझ्या स्त्रीचें तें शारीरिक अतएव निकृष्ट प्रेम तुला नावड- ल्यामुळे तूं या मानसिक प्रेमाच्या मागे लागून लोकांच्या बागेतलीं गुला- बाचीं फुले शोधीत फिरत आहेस ! दिनकर, लक्षांत ठेव. हा गुलाबाच्या फुलांचा शोक बरा नाहीं. एकादे वेळीं गुलाबाचे तीक्ष्ण कांटे हाताला बोचल्यास त्या वेदनांची आठवण तुला जन्मभर राहील. " 66 पांडुरंग ह्मणाला, " उत्क्रांति तत्त्वाच्या दृष्टीनें पाहिल्यास मनुष्यानें क्रमाक्रमानें आध्यात्मिक प्रेमाकडे जावें, असेंच कोणास ह्मणतां येईल; पण दिनकरला हा सरळ न्याय पसंत नाहीं असे दिसतें. प्रापंचिक कर्तव्ये सगळी
पान:सुखाचा शोध.pdf/१०४
Appearance