Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भूमिका.

 आजपर्यंत जेवढे आम्हीं ऐकिलें आहे, व पाहिलें आहे, त्यांत सीतादेवीची बरोबरी करणारी एकहि स्त्री आम्हांला आढळली नाहीं. आम्हांला अशी सुद्धां शंका वाटते कीं, भविष्यकाळीं तरी जनकनंदिनीच्या गुणाची बरोबरी करील अशी एखादी स्त्री निघेल किंवा नाहीं ? आम्हांलाच काय, परंतु मोठमोठ्या प्रतिभाशाली कवींना सुद्धां अशी शंका उत्पन्न झाली. ते या बाबतीत हारले, व निराश झाले. पण त्यांना देखील सीतेप्रमाणें स्त्री आढळली नाहीं. याचमुळे महर्षि वाल्मिकीनें सीतादेवीला ' अनुपमा' ठरविले आहे.. सरळपणा, सुशीलपणा, सच्चरित्रता, पतिपरायणता, कृतज्ञता, गंभीरता, आणि सुंदरता, या सर्व गोष्टींत सीतादेवी अद्वितीय होती. कोणीं जर आम्हांला विचारिलें कीं, येथे सतीशिरोमणि स्त्री कोण होऊन गेली, तर आम्हीं उत्तर देऊं कीं, ' सीतादेवी. ' जर कोणी सरलतेच्या व पवित्रतेच्या मूर्तिमान स्त्रीचा शोध केला, तर आमचे लक्ष प्रथम महाराणी सीतादेवीकडेच जाईल. सर्वोत अधिक अलौ- किक सौंदर्यसंपन्न नारी कोण झालेली आहे, हें जाणण्याची जर कोणाला इच्छा असेल, तर आम्ही मोठ्या प्रसन्नतेनें उत्तर देऊं की ' महाराज रामचंद्राची प्राणेश्वरी सीतादेवीच. '

 'होनहार बिरवान के होत चीकने पात' ह्या म्हणीप्रमाणे सीतादेवी बाल्यकालापासून होणार असे वाटूं लागलें. तिचा जन्म राजर्षि जनकासारख्याच्या घरी झाला, ही तिच्याकरितां मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. राजर्षि जनकाच्या घरी तिचे लालनपालन होऊन तिच्या स्वाभाविक सरल स्वभावाची व सुशीलतेची वृद्धि झाली. महात्म्या जनकाच्या उदार भावनांचा, त्याच्या सदाचारां- चा, त्याच्या धर्मानुराग व कर्तव्यनिष्ठेचा सीतादेवीच्या कोमल


 १ 'मुलाची चिन्हें पाळण्यांत दिसतात,' अशा अर्थाची ही म्हण आहे...